शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पिंपरी चिंचवड मनपा, सर्वसाधारण सभा : वाहतनळ धोरणावर आज शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतनळ धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे धोरण सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाहतनळ धोरण तयार केले आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हे धोरण सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधक काय भूमिका घेतील याबाबत उत्सुकता आहे.पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे एकवीस लाख असून, वाहनसंख्या सोळा लाख आहे. हे नागरिक विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनाने ये-जा करीत असतात. हे करताना वाहनांचे पार्किं ग योग्य ठिकाणी करणे हा दिवसेंदिवस एक जटिल प्रश्न बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट वाहतूक करण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाहनतळाचे धोरण तयार केले आहे. त्यासाठी दिल्ली, चेन्नई, पुणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर या शहराच्या पार्किं ग पॉलिसींचा अभ्यास केला आहे. त्याचे संगणकीय सादरीकरण महापालिका लोकप्रतिनिधींसमोर केले होते.१ रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून ही जागा वाहनतळासाठी असल्याचे स्पष्ट केले जाईल. या पिवळ्या पट्टयाच्या आत वाहन उभे करणेही आवश्यक असणार आहे. सर्व वाहनतळांवर फलक लावणे बंधनकारक असेल.२फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असेल. सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या-त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.३ पार्किंग पॉलिसीत ‘अ’ (उच्च पार्किंग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण साठ ते ऐंशी टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्किंग), ज्या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के पार्किंगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्किंग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्किंग) म्हणून घोषित केले जाणार आहे. सद्य:स्थितीत झोन ‘ड’ पार्किंग धोरणातून वगळले आहे.४ गेल्या वीस वर्षांत वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचे प्रमाणही वाढते आहे. सन २००१ मध्ये एक लाख ६४ हजार असणाºया दुचाकी आता बारा लाख आहे. चार चाकी वाहनांची संख्या २००१ मध्ये वीस हजार होती. ती आता अडीच लाखांवर पोहोचली आहे. २००१ मध्ये शहरात दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारची दोन लाख दहा हजार वाहने होती. हा आकडा सोळा लाखांवर गेला आहे.५ रस्त्यावरील पार्किंगसाठी झोन ‘अ’ मधील रस्त्यांकरिता एका मोटारीसाठी एक ईसीएसकरिता दहा रुपये प्रति तास आकारण्यात येणार आहेत. निवासी पार्किंगसाठी रात्री अकरा ते सकाळी आठ या वेळेसाठी पंचवीस रुपये प्रतिदिननुसार नऊ हजार तीनशे पंचवीस रुपयांचा वार्षिक परवाना देण्यात येणार आहे. त्यानुसार, पार्किंग दर ठरविण्यात आले आहेत. मात्र, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना शुल्कातून सवलत मिळणार आहे.६पार्किंग धोरणात पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करत दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. गावठाण भाग आणि झोपडपट्टींना यातून वगळले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी मासिक पास उपलब्ध करून देण्याची तरतूद धोरणामध्ये आहे. तर, सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे, यांना सशुल्क पार्किंगमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतच्या धोरणाला स्थायी समितीत मंजुरी दिली. त्यानंतर हे धोरण सर्वसाधारण सभेसमोर चर्चेला येणार आहे. पार्किंगचे मूळ दर हे वाहनाने व्यापणाºया जागेच्या प्रमाणात असतील.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या