शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सहा हजार काेटींचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 12:33 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमाेर सादर करण्यात आला.

पिंपरी – 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी स्थायी समितीला सादर केला.

सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प आहे. तर,  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तीसरा अर्थसंकल्प सादर केला आहे.

महत्त्वाचे उपक्रम

1) प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी विनायकनगर, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणे.

2) वेंगसरकर अॅकॅडमी येथे पॅव्हेलीयनचे काम करणे, थेरगांव येथे खेळाचे मैदान विकसित करणे, पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६२ येथे खेळाचे मैदान विकसित करणे.

3) पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६७ अयेथे खेळाचे मैदान विकसित करणे.या कामांसाठी एकूण तरतूद र.रु.११कोटी ८५ लाख.

 4)  प्रभाग क्रमांक १० पिंपरी येथील स्व्हे नं. ३१/१ -१ येथे नि:समर्थ दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे, आकुर्डी येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधणे, थेरगांव सर्व्हे नं.९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नविन इमारत बांधणे या कामांसाठी एकूण तरतूद र.रु.१७ कोटी ९५ लाख

5) वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे र.रु.४ कोटी

6) ताथवडे येथील शनी मंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे,  र.रु.५ कोटी,  ताथवडे गावठाणापासून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे र.रु.४ कोटी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकर