शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आचारसंहितेपूर्वी गुणवंतांना दीड कोटींची बक्षिसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 21:19 IST

दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्कमेचे वाटप हे पवनाथडी जत्रेत होत असतात. हा कार्यक्रम नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होत असतो. मात्र...

पिंपरी : विनधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जारी होणार असल्याने डिसेंबरला गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीसे आचारसंहितेपूर्वीच लाभार्थीच्या खात्यात जमा केली आहेत. महापालिका क्षेत्रातील ११९२ विद्यार्थ्यांना १ कोटी ४८ लाखांची बक्षीसे दिली आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. ८० टक्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार तर ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपये बक्षीस दिले जाते. तसेच बारावीतील ऐंशी टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते. यासाठी महापालिकेकडे ४५०० अर्ज आले होते. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत २५ सप्टेंबर आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्कमेचे वाटप हे पवनाथडी जत्रेत होत असते. हा कार्यक्रम नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होत असतो. मात्र, विधानसभानिवडणूकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच त्यापैकी पहिल्या टप्यात ११९२ विद्यार्थ्यांना बक्षीसाची रक्कम खात्यात जमा केली आहे. तसेच महापालिका शाळांत शिकणाऱ्या ८९ विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली आहेत. त्यात तीन लखपती मुलांसह ८० टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना २५ हजार, ८५ टक्क्याहून अधिक गुण मिळविणाºयांना पन्नास हजार, तर नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळविणाºयांना एक लाखांचे बक्षीस दिले जाते. तसेच अंध शाळेतील दहावीच्या मुलांना प्रत्येक पन्नास हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते. महापालिका शाळांतील ८९ विद्यार्थ्यांना सुमारे ३० लाख ७५ हजारांची बक्षीसे लाभार्थीच्या खात्यात जमा केली आहेत.स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, महापालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आलेल्या अजार्पैकी अकराशे अर्जाची छाननी पहिल्या टप्यात झाली. आचारसंहितेचा अडसर ठरू नये, म्हणून आज लाभार्थ्यांच्या खात्यात बक्षीसाची रक्कम जमा केली आहे. तसेच दुसऱ्या टप्यातील बक्षिसांची रक्कम लवकरच लाभार्थींना देण्यात येईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक