शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

PCMC Budget: पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; शहरातील 'या' सुविधांवर भर

By विश्वास मोरे | Updated: March 14, 2023 21:17 IST

शिक्षण आणि आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय सेवा, रुग्णालये, शाळा, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल, नदीवरील पूल, रस्ते पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर

पिंपरी : महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी मंजूर करण्यात आला. मिळकतकरात कर आणि पाणीपट्टी दरात दरवाढ नसलेला सन २०२३ - २०२४ या आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८ कोटींचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२८ कोटी रुपयांच्या अर्थसंल्पास एकाच दिवसात मंजूरी दिली. जुण्याच योजनांना मुलामा दिला आहे. ७१८ कोटी ६८ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असून नदीसुधारसाठी कर्जरोखे आणि आरोग्य सुविधांसाठी सोशल इम्पॅक्ट बॉड घेण्याचे धोरण स्विकारले आहे.

 महापालिकेचा हा ४१ वा अर्थसंकल्प असून तर प्रशासक आणि आयुक्त म्हणून शेखर सिंह यांचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात प्रारुप अर्थसंकल्प महापालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी प्रशासकांना सादर केला. प्रशासकीय राजवटीमुळे प्रशासनाने तयार केलेल्या अर्थसंकल्प मंजूर करणारी सक्षम समितीचे प्रमुख प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी एकाच दिवसात अर्थसंकल्प मंजूर केला आहे. १ एप्रिल २०२३ पासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

नव्या योजना, प्रकल्पांचा अभाव

नवीन प्रशासकीय इमारत, रूग्णालये इमारत, नदीसुधार असे अपवाद वगळता नव्या प्रकल्पांच्या घोषणा नाहीत. उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढविणार याबाबतही अर्थसंकल्पात माहिती नाही. फक्त मिळकतकर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्त्रोत सक्षम करण्याचे धोरण आहे. मिळकत आणि पाणीपट्टी दरवाढ टाळली आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी निधी तरतूद आहे. प्रगतीपथावर असणारे रुग्णालये, शाळा, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल, नदीवरील पूल, रस्ते पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर दिलेला आहे. शिक्षण आणि आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय सेवा सुविधावर भर दिलेला आहे.  महापालिका इमारत आणि नदीसुधार वगळता कोणताही मोठा प्रकल्प अर्थसंकल्पात दिसत नाही. 

आला रूपया.....

सन २०२३ - २४ या आगामी आर्थिक वर्षाच्या ५ हजार २९८ कोटी ३० लाखांच्या मूळ अर्थसंकल्पात ३ कोटी ३० लाख रुपये शिल्लक दाखविली आहे. जमेच्या बाजूस ४१.८२ टक्के म्हणजे सुमारे २२१३ कोटी रुपये वस्तु व सेवा कर आणि ०.२१ टक्के म्हणजेच ११ कोटी रुपये स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून उत्पन्न अपेक्षित धरले आहे. मिळकतकरातून ८५० कोटी आणि बांधकाम परवाना विभागातून ९५० कोटी, भांडवली जमा ६०१ कोटी, पाणीपट्टीमधून ८८ कोटी आणि गुंतवणुकीवरील व्याजातून १२४ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.गेला रूपया....

खर्चाच्या बाजूस सार्वजनिक बांधकामासाठी १४५३ कोटी रुपयांची आणि सामान्य प्रशासन विभागासाठी १२५१ कोटी रुपयांची तरतुद आहे. नियोजन आणि नियमनायाठी १६६ कोटी, आरोग्य विभागासाठी ३७२ कोटी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी ४७८ कोटी, नागरी सुवधिेसाठी ५६२ कोटी, शहरी वनीकरण ५१९ कोटी, शहरी गरीबी निर्मुलन व समाजकल्याण विभागासाठी १७२ कोटी, इतर सेवांसाठी २४५ कोटी अशा प्रमुख तरतुदी आहेत. याखेरिज, स्मार्ट सिटी (५० कोटी) , अमृत अभियान (२० कोटी) , स्वच्छ भारत अभियान (१० कोटी) आणि पंतप्रधान आवास योजना (१० कोटी) या सरकारी योजनांसाठी तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये !

१) विविध विकास कामांसाठी १८०१ कोटी ३५ लाख२) शहरी गरिबांसाठी १५८४ कोटी  ३) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी १४१ कोटी ५४ लाख४) पाणी पुरवठा विशेष निधी १५४ कोटी५) अमृत योजना तरतूद २० कोटी६) स्वच्छ भारत मिशनसाठी १० कोटी७) स्मार्ट सिटी तरतूद ५० कोटी८) दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी ४५ कोटी९) अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता १० कोटी१०) पीएमपीएलसाठीची तरतूद २९४ कोटी

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2023MONEYपैसाCentral Governmentकेंद्र सरकार