शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभापतींसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:12 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिलअखेरीस संपुष्टात येणार असून, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध समितींवर सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने सभापती सत्तारूढ पक्षाचेच होणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर, पक्षनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदे आहे. त्या पाठोपाठ विधी समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती, जैवविविधता समिती अशा पाच प्रमुख समित्या आहेत. विधी समिती सभापतिपदी शारदा सोनवणे, कला-क्रीडा-समिती अध्यक्षपदी लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी सुनीता तापकीर, शहर सुधारणा समिती सभापतिपदीसागर गवळी, जैवविविधता समिती अध्यक्षपदी उषा मुंढे या आहेत. पाचही समिती सदस्यांचीमुदत एप्रिलअखेरला संपणार आहे. त्यामुळे नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.विधी समितीत नऊ, जैवविविधता समितीत सात, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा समितीवर प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य प्रत्येक समितीत जाणार आहे. त्यामुळे काही पक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत.नेत्यांचे उंबरे झिजविणे सुरूस्थायी समिती, महापौर आणि उपमहापौर, पक्षनेते आदी पदांवर संधी न मिळालेल्यांसाठी विषय समिती सभापती हे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यावर संधी मिळावी, यासाठी नगरसेवकांनी चिंचवड, पिंपरी, भोसरीतील भाजपाच्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. नगरसेवक नेत्यांचे उंबरे झिजवीत आहेत. सर्व समित्यांवर वर्चस्व असल्याने सभापती भाजपाचेच होणार आहेत. समितीवर आमदार महेश लांडगे किंवा आमदार लक्ष्मण जगताप या गटांपैकी कोणाची वर्णी लागते, याविषयी चर्चा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या