शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्प १५ फेब्रुवारीला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 03:37 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आयुक्त श्रावण हर्डीकर हे १५ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत.

पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आयुक्त श्रावणहर्डीकर हे १५ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. त्यात पिण्याचे पाणी आणि मिळकतकर वाढ काय असतील याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे.महापालिकेने या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, १०१ जणांनी कामे सुचविली आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठाविषयक कामे आहेत. या कामांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे. आगामी वर्षात शून्य तरतूद असलेले सर्व लेखा शीर्षक वगळण्यात येणार आहेत.जेवढ्या रकमेचे काम आहे, तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवावी, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे वाढीव, सुधारित खर्चाला आळा बसणार आहे. जेवढी कामे करायची तेवढ्याच कामांचा समावेश अर्थसंकल्पात करावा. अनावश्यक कामांचा करू नये. शून्य तरतूद अथवा टोकन हेडला यंदापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मांडत असलेल्या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना असतील. अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा आकारदेखील लहान असणार आहे.अर्थसंकल्पाला होणार उशीरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होती. त्यामुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करूनही त्यास मंजुरी मिळाली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाच्या हाती महापालिकेची सूत्रे आली. त्यानंतर आयुक्तांनी सादर स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अमुलाग्र बदल करण्यात आले. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरी, महासभेतील चर्चा यासाठी बराच कालखंड गेला. परिणामी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याची विलंब लागला.अर्थसंकल्प तयार करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. महापालिकेतील दोन विभागांनी माहिती वेळेत दिलेली नसल्याची नाराजी लेखा विभागाने व्यक्त केली आहे. संबंधित विभागांना पत्रही दिले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या कामाला उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड