शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad Lockdoon : पॉझिटिव्हीटी रेट झाला कमी, पिंपरीत मॉल, हॉटेल वगळता सर्व दुकाने होणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 20:38 IST

कोरोनाचा आलेख कमी झाल्याने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा दहा टक्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी महापालिकांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

पिंपरी : औद्योगिकनगरीतील कोरोनाची रुग्णसंख्या पाचशेच्या आत आल्याने आणि रुग्णवाढीचा दर साडेआठ टक्यांवर आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. अत्यावश्यक सेवेसह, सर्व दुकाने मंगळवार पासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार असली तरी पीएमपीएमल बस, हॉटेल, उद्याने बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनाचा आलेख कमी झाल्याने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा दहा टक्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी महापालिकांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचा रुग्णवाढीचा साडेआठ टक्के आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेतली. स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.

राजेश पाटील म्हणाले, ‘‘आतार्पयत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु होती. मात्र, आता या दुकानांबरोबरच इतर कापड, भाजी मार्केट, ज्वेलर्स, कटींग सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार आहेत. कामांचे सर्व दिवस बँका आणि मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार आहे.’’................................यांना नाही परवानगी१) मॉल्सला परवानगी दिलेली नाही. तसेच हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पूर्वी प्रमाणेच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे.२) दुपारी २ नंतर सर्व दुकाने बंद राहणार असून केवळ मेडीकल दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही २५ टक्के असणार आहे. कोणत्याही प्रकारची होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. तसेच शेतीविषयक दुकाने आठवड्याच्या सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार आहेत..................काय राहणार सुरू१) अत्यावश्यक सेवामधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.२) महापालिका क्षेत्रातील बँकाचे काम सर्व दिवस सुरू राहातील.३) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.४)  ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.५) दुपारी ३ वाजल्यानंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.६)  सर्व शासकीय कार्यालये २५  टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुरू राहतील.७) मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार