शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पिंपरी-चिंचवड : प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:09 IST

कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या चालू वर्षातील तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार दिवसेंदिवस वायुप्रदूषणाने आरोग्य धोक्यात येत आहे.

पिंपरी  - कोणे एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे शहर होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या चालू वर्षातील तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार दिवसेंदिवस वायुप्रदूषणाने आरोग्य धोक्यात येत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनाने शहरातील प्रदूषण पातळी मोजण्याकरिता पाच ठिकाणे निवडली आहेत. यात पिंपरी-चिंचवड, भोसरी, कर्वे रस्ता, नळ स्टॉप आणि स्वारगेट यांचा समावेश आहे. तीन महिन्यांतील आकडेवारीचा अभ्यास केला असता, साधारणपणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे म्हणाले की, उन्हाळ्यात हवी हलकी राहते. त्यामुळे धूलिकण तरंगत राहण्याचे प्रमाण वाढल्याने श्वसनास अडथळा निर्माण होतो. जास्त धूलिकणाच्या वातावरणात श्वसनाचे विविध आजार होण्याच्या धोका संभवत असल्याचे पाहवयास मिळते. मागील तीन महिन्यांत वातावरणात तरंगणाऱ्या या धूलिकणांचे प्रमाण हे जास्तीत जास्त १८६ मायकोग्रॅम प्रतिलिटर इतके असून, सल्फरडाय आॅक्साईड आणि नायट्रस आॅक्साईड यांचे प्रमाण अनुक्रमे ५४ आणि १४७ मायक्रोग्रॅम प्रतिलिटर एवढे आहे. सर्वसाधारण परिणाम, श्वसनास अडथळा निर्माण होण्यासारखी परिस्थिती, फुप्फुसांचे विकार असणाºया व्यक्ती, मुले, प्रौढ व्यक्ती, निरोगी व्यक्तींच्या श्वसनावर परिणाम करेल अशी परिस्थिती या कारणांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आकडेवारीचे वर्गीकरण केले आहे. वायुप्रदूषणामुळे दैनंदिन श्वासोच्शवलसाकरिता लहान मुले, आणि प्रौढांना त्रास सहन करावा लागत असल्याचेदिसून आले आहे. दिल्लीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वांत जास्त प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण मापन करणाºया संस्थेच्या संकेतस्थळावर पुण्यातील हवेत मुंबईहून अधिक प्रदूषण नोंदवले गेले आहे.सातत्याने खालावत जाणाºया वायुप्रदूषणामुळे दैनंदिन श्वासोच्छ्वासाकरिता लहान मुले आणि प्रौढांना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वांत जास्त प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण मापन करणाºया संस्थेच्या संकेतस्थळावर हवेत प्रदूषण नोंदवले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpollutionप्रदूषण