शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलला मुहूर्त, प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 02:03 IST

धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

पिंपरी : धार्मिक उत्सव आणि सणांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून भविष्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येतील. यासंदर्भातील निर्णय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होईल, त्यात खंड पडणार नाही, असे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले.न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन या वर्षी दिंडी प्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तू, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल, गणेशोत्सव सजावट स्पर्धा, गणेशोत्सवातील स्वागत कक्ष न उभारल्याबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका झाली होती. त्यामुळे महापौर जाधव यांनी बैठक घेतली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधीपक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, शहर सुधारणा समिती सीमा चौगुले, जैवविविधता समिती सभापती उषा मुंडे, नामदेव ढाके, सुलक्षणा धर, श्याम लांडे, तुषार कामठे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मंगेश चितळे आदी उपस्थित होते. प्रशासनाने चुकीची माहिती दिली़ न्यायालयाच्या आदेशावर बैठक घेऊन चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने सजगता दाखविली नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायालय आदेशाचे अवडंबर माजविले गेले आहे. या आदेशाचा अभ्यास अधिकाºयांनी केलेला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.सत्तारूढ पक्षनेते पवार म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या आदेशास अधिन राहूनच आपल्याला काम करायचे आहे. आपण कोणते उपक्रम राबवू शकतो किंवा नाही याबाबत पदाधिकाºयांनी माहिती देणे गरजेचे आहे. न्यायालय आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊ.’’कलाटे म्हणाले,‘‘न्यायालय आदेश आल्यानंतर यासंदर्भात अधिकाºयांनी तातडीची बैठक घेऊन पदाधिकºयांना माहिती देणे गरजेचे होते. तसे झाले नाही. पालखी सोहळ्यातील भेटवस्तू, गणेश सजावट स्पर्धा, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलवरून टीका झाल्याने अधिकाºयांना जाग आली आहे.’’महापौर जाधव म्हणाले, ‘‘कोणतीही परंपरा खंडित करण्याचा उद्देश नाही. न्यायालय आदेशाच्या अधिन राहून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यावर भर देणार आहे. तसेच ट्रस्टची स्थापना करून त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलचेही आयोजन केले जाईल.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या