शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर आचारसंहिता संपली, आठशे कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 30, 2024 10:26 IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या सव्वा महिन्यापासून लागू असलेली आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे महापालिकेची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने विकासकामांना गती येणार आहे. तब्बल आठशे कोटींची कामे मार्गी लागणार आहेत.राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा १५ ऑक्टोबरला केली होती. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू केली होती. निवडणुकीची आचारसंहिता २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनास पत्र पाठविण्यात आले आहे.महापालिकेचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च आहे. मात्र, यावर्षी मार्च महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. ती सुमारे अडीच महिने होती. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील अनेक विकासकामे होऊ शकली नाहीत. महापालिकेच्या स्थायी समितीने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाचशे कोटींहून अधिकच्या कामांना मान्यता दिली होती. त्यापैकी अनेक कामांचे कार्यादेश देण्यास उशीर झाला. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ही विकासकामे रखडली होती. आता ती मार्गी लागणार आहेत.चार महिन्यांत निधी खर्ची पडणारलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत सुमारे चार महिने गेले आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेचे कर्मचारी असल्याने अनेक प्रकल्प आणि कामे मागे पडली आहेत. महापालिकेचे नवीन अंदाजपत्रक १ एप्रिलपासून लागू करण्यात येते. या चार महिन्यांत अंदाजपत्रकातील निधी खर्ची पडणार का, अनेक कामासाठी टाकलेला निधी वाया जाणार का, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या चार महिन्यांत विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडून लगबग सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना वित्तीय मान्यतेनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जनसंवाद सभाही होणार सुरळीतआचारसंहिता काळात शहरातील विकास प्रकल्पांना खीळ बसली. प्रस्तावित विकासकामांच्या निविदा आहे, त्या स्थितीत थांबवून फाइल बंद करून ठेवाव्या लागल्या. अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामकाजात व्यस्त झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली. नागरिकांचे प्रश्न क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सोडविण्यासाठी सुरू केलेली जनसंवाद सभादेखील रद्द करण्यात आली. त्या आता सुरळीत सुरू करण्यात येणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका