पिंपरी : अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर अमानुष लाठीमार करत मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर आज (दि.०९) बंद करत महामोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहर आयोजित पिंपरी-चिंचवड शहर बंदला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शहरातील अठरापगड बारा बलुतेदार एकटवला आहे. अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या मोर्चाला शहरातील शंभरच्यावर संघटनांनी पाठिंबा दर्शवत महामोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे यांनी दिली.असा असेल मोर्चाचा मार्ग...
सकाळी १० वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर पिंपरीतील डीलक्स चौक मार्गे मेन बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक यांची निषेध सभा होवून महामोर्चाचे सांगता होणार आहे.मोर्चाला येताय हे पाळाच...
१) सर्वांनी डोक्यावर भगवी अथवा पांढरी वारकरी टोपी घालुन यावी.२) अंगात भगवा, पांढरा अथवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करावा.३) शक्य असेल त्याने भगवाच ध्वज घेऊन येणे.४) पाणी बॉटल स्वताची स्वत: आणल्यास अतिऊत्तम होईल.५) सर्वांनी सकाळी १० वाजता पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमा व्हायचे आहे.६) कोणीही कसलेही गैरवर्तन करणार नाही.७) कुठल्याच पक्षाविरोधात अथवा व्यक्ती विरोधात घोषणा देणार नाही.हे सुरू राहणार..
हॉस्पीटल्स, रुग्णवाहिका, महत्त्वाच्या कामासाठी जाणारी प्रवासी वाहने, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना, रूग्णांना घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षा, सकाळच्या सत्रात दुध, भाजीपाल्याची बाजारपेठ व वाहने सुरु राहातील. औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या ज्यांना बंद ठेवता येत नाहीत, महत्त्वाचे उत्पादने निर्मिती करतात, त्यांनाच.हे बंद राहणार...
बससेवा, पीएमपीएमएल बस, शहरातील काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. सर्व दुकाने, स्वयंस्फूर्तीने शाळा, महाविद्यालये, मॉल आदी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.