शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:44 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात शहरातील जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे माहापलिका प्रशासनाच्या स्थापत्य विभागाच्या वतीने अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदा ९० घर मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. तसेच, जी घरे जीर्ण झालेली आहेत, ती लवरात लवकर संबंधित मालकांनी दुरुस्त करून घेण्याचे बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी अशा धोकादायक इमारतींची संख्या १२१ इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा इमारतीच्या संख्येत घट झाली आहे.पावसाळा सुरू झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाने पाहणी करून त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. पावसाळ्यात जुन्या इमारतींचा धोका निर्माण होऊन वित्तीय व जीवित हानी होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना घर मालकांना करण्यात आलेल्या आहेत.तसेच, धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना, आसपासच्या परिसरातील रहिवाशांना व या भागातून ये-जा करणाºयांना नागरिकांना कोणतीही इजा पोहोचू नये, यांची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर स्थापत्य विभाग धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करीत असते.यंदाच्या वर्षी केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील ९९ इमारती धोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. त्या सर्व धोकादायक इमारतींच्या घर मालकांना स्थापत्य विभागाने नोटीस दिल्या आहेत. धोकादायक इमारतींची त्वरित दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित घर मालकांची आहे.तसेच, जर घर मालक इमारत दुरुस्त करणार नसतील, तर भाडेकरूही महापालिकेची परवानगी घेऊन ते धोकादायक इमारतींची दुरुस्ती करून घेता येईल. याबाबत धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीस तातडीने परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महापालिका हद्दीतील नागरिकांना धोकादायक इमारत आढळल्यास त्यांनी महापालिका स्थापत्य विभागास लेखी स्वरूपात कळवावे. कोणत्याही इमारतींचा अर्धवट भाग कोसळल्यास नागरिकांनी त्वरित आपत्कालीन विभागास तातडीने कळवावे, असे आवाहन स्थापत्य विभागाने केले आहे.असे असते नोटिसीचे स्वरूपइमारत धोकादायक स्थितीतअसल्याचे निदर्शनासस्थापत्य विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसनागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर इमारतीचा संबंधित भाग दुरुस्त करावाशक्य नसल्यासमहापालिकेला कळवावे.दुरुस्तीचा खर्च पालिकेला दिल्यास पालिका दुरुस्तकरून घेईल.‘‘नागरिकांनी नोटिसांचा गंबीरपणे विचार करावा व इमारतींची दुरुस्ती करावी. संबंधित मालकांना शक्य नसल्यास त्यांनी स्थापत्य विभागास कळवावे. आवश्यक शुल्क जमा करून महापालिकेकडून दुरुस्ती करून दिली जाईल. नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.- अंबादास चव्हाण, शहर अभियंता, स्थापत्य विभाग