शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुळा नदी सुधारविषयी पर्यावरणवाद्यांशी बैठकीचा महापालिकेने केला फार्स

By विश्वास मोरे | Updated: April 16, 2025 21:01 IST

कोणताही ठोस निर्णय नाही : पर्यावरणवाद्यांचे आंदोलन सुरू राहणार 

पिंपरी: मुळा नदी सुशोभीकरणाला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याची सूचना केल्यानंतर बुधवारी महापालिकेत बैठक झाली. मात्र, त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. महापालिकेने केवळ बैठकीचा फार्स केला. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाचा पवित्र कायम ठेवला आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.

त्यामुळे नदी अरुंद होणार आहे.  याविषयी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर महापालिकेला बैठक घेण्याची सूचना केली होती. यासंदर्भातील बैठक आज महापालिकेत झाली.  यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खराटे,  उपायुक्त उमेश ढाकणे, पर्यावरण विभागाचे शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. पर्यावरणवादी संघटनांच्या वतीने जलबीरादरी संस्थेचे नरेंद्र चूघ, ज्येष्ठ पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे, पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे तुषार शिंदे, बाबा भोईर,  सुरेश भोईर, सागर चिंचवडे, सूर्यकांत मुथियान, शुभम पांडे, राजू सावळे,  आदी उपस्थित होते. प्रशासन निरुत्तर यावेळी सर्व पर्यावरणवादी संघटनांनी आपली भूमिका मांडली. नावाखाली नदी सुधारच्या नावाखाली काँक्रिटीकरण करून नदी अरुंद केली जाणार आहे. सुशोभीकरण करण्याऐवजी नद्या स्वच्छ कराव्यात, सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे. तोपर्यंत हा प्रकल्प राबवू नये, सध्या सुरू असणारी वृक्षतोड थांबवावी. गेल्या दोन दशकांपासून नदी स्वच्छ करण्याची नुसती चर्चा होत आहे.  मात्र, त्यावर कोणत्याही उपाययोजना झालेलया नाहीत. प्रशासन केवळ धूळफेक करत आहे,  अशी भूमिका मांडल्यानंतर आयुक्त शेखर सिंह म्हणाले, 'ऑगस्ट अखेरपर्यंत नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी प्रक्रिया करूनच पाणी सोडले जाईल. उपाययोजना करण्यात येतील.' नैसर्गिक नदीकाठ उध्वस्त केल्यानंतर त्या ठिकाणी असणारे जैवविविधता याचे काय होणार? याविषयी शुभम पांडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर कोणतेही उत्तर प्रशासनाला देता आले नाही. पर्यावरणवादी आणि महापालिकेच्या वतीने बोलवलेल्या बैठकीमध्ये केवळ प्रश्न- उत्तरे झाली. मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पर्यावरणवाद्यांकडून सुरू असणारे नदी बचावचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे धनंजय शेडबाळे यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूक