शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 02:20 IST

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते कामशेत या भागातील महामार्गाच्या कडेला असलेल्या लॉजिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून

कामशेत : मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी लॉजमध्ये देहविक्रीच्या व्यवसाय सुरू आहे. सोमाटणे, देहूरोड आणि तळेगाव आदी भागातील महामार्गावरील व्यवसाय विस्तारित होऊन कामशेत आदी भागात सुरू झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड ते कामशेत या भागातील महामार्गाच्या कडेला असलेल्या लॉजिंगमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून, त्यामुळे आजूबाजूच्या भागात असलेल्या वसाहतीतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे. सोमाटणे, तळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, कामशेत आदी भागात वेश्याव्यवसाय मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक प्रतिष्ठित लोकांचे लॉजिंग सुरू असून, यात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. हाच प्रकार वडगाव व कामशेत महामार्ग परिसरात आहे. शिवाय येथे हुल्लड, व्यसनाधीन युवकांकडून पर्यटक, नागरिक, प्रवासी आदींची लूट, मारहाण आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

महामार्गावर सुरू असलेल्या या अवैध देहविक्रीच्या व्यवसायाला चाप बसावा, म्हणून पोलीस प्रशासन ठोस पावले उचलत नाही. त्यामुळेच वडगाव, कामशेतसारख्या भागात त्यांचे पेव फुटले आहे. कामशेतमध्ये काही दिवसांपूर्वीच गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने महामार्गावरील एका लॉजवर कारवाई केली. स्थानिक पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने हा व्यवसाय कामशेत व परिसरात वाढू लागला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईची विशेष मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. तसेच कामशेतमधील महामार्गावर सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.बेरोजगार युवक : गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेमावळ तालुक्यामध्ये जमिनीला मोठ्या प्रमाणात भाव आला आहे. त्यामुळे अनेक युवक झटपट श्रीमंत झाले आहेत. तसेच या भागामध्ये अनेक युवक बेरोजगारही आहेत. लॉजधारकांनी अशा युवकांना सावज शोधण्याच्या कामासाठी पगार देऊन ठेवले आहे. हे युवक अनेक वेळा बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना त्रास देतात. तसेच लुटमारीच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटत चालली आहे. महामार्गावर राजरोसपणे सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय बंद करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी