शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत चार लिपिकांवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:42 IST

महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली.

ठळक मुद्देजलतरण तलावांवर कामकाज सदोष आढळल्याने नोटीस : क्रीडा विभाग

पिंपरी : महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली. यात सदोष कामकाज आढळलेल्या तलावांवरील १३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांतील काही कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे चार लिपिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नोटीस त्यांना बजावण्यात आल्या आहेत. तलांवावरील दोन ठेकेदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.उन्हाची तीव्रता वाढल्याने जलतरणर तलावांवर पोहणाºयांची गर्दी होत आहे. शाळांना सुटी लागल्याने त्यात विद्यार्थ्यांचीही भर पडत आहे. याचा फायदा घेत काही तलावांवर लिपिक, जीवरक्षक आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून संगनमताने तिकिटांच्या माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून जलतरण तलावांवरील कामकाजाची पाहणी करण्यात आली. क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त आशा राऊत यांनी पर्यवेक्षकांचे भरारी पथक नेमून त्यांना तलावांवर अचानक पाहणी करण्याची सूचना केली. राऊत यांनीही पाहणी केली. काही तलावांवर तिकिटांपेक्षा जास्त लोक पोहण्यासाठी सोडण्यात आले होते. काही ठिकाणी जीवरक्षक गणवेशात नव्हते. तर काही तलावांवर तारीख वेळ नमूद न करता आणि शिक्के नसलेली तिकिटे देण्यात आल्याचे भरारी पथकांना पाहणी दरम्यान आढळून आले. 

स्थापत्य, विद्युतविषयक कामे करण्याची गरजभरारी पथकांच्या पाहणी दरम्यान काही तलावांवर स्नानगृहातील शॉवर तुटले असल्याचे आढळले. तसेच विद्युतविषयक आणि स्थापत्यविषयक कामे करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले. अशा कामांबाबत स्थापत्य आणि विद्युत विभागाच्या अभियंत्यांना पत्र देण्यात आले आहे. संबंधित कामे त्वरित करून तलाव अधिक सुरक्षित करून नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे आशा राऊत यांनी सांगितले.

नियमांचे पालन व्हावेजलतरण तलावांवर काही कर्मचारी गैरप्रकार करतात. अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी सातत्याने अचानक पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कायमस्वरुपी भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनी आणि तलावांवर येणाऱ्या नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

थेरगावच्या तलावासाठी नाही पुरेसे मनुष्यबळशहरात महापालिकेचे १३ जलतरण तलाव आहेत. यात महापापिका आयुक्तांच्या बंगल्यात एक तलाव आहे. तो नागरिकांसाठी खुला नाही. उर्वरित १२ तलाव नागरिकांसाठी खुले आहेत. यातील थेरगाव येथील तलाव दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. त्याची दुरुस्ती झाली असून, तो खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र क्रीडा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा तलाव खुला करण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच हा तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे क्रीडा विभागातर्फे सांगण्यात येत आहे.

तलावांवर कामकाज व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्याने दोन ठेकेदारांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या नोटीस चार लिपिकांना बजावण्यात आल्या आहेत. - आशा राऊत, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड