शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, शांततेत निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 15:45 IST

विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने परिसरात सर्वत्र शुकशुकाटमोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी

पिंपरी-चिंचवड (रहाटणी) : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना व भीम सैनिकांनी तसेच राहुल मित्र मंडळ व सारनाथ बुद्ध विहार व परिसरातील अनेक कार्यकर्ते एकत्रित येत राहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात काढलेला निषेध मोर्चा शांततेत पार पडला, त्यास स्थानिक व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात अगदी सकाळ पासूनच सर्वत्र व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने परिसरात सर्वत्र शुकशुकाट होता. सकाळी रहाटणी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्तात कोकणे चौक, शिवार चौक, कुणाल आयकॉन रस्ता, गोविंद यशदा चौक, गंगा पार्क चौक, पिंपळे सौदागर गावठाण पुन्हा रहाटणी चौकातील सारनाथ बुद्ध विहाराजवळ निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती. या परिसरातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करताच त्याला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चात सहभाग घेतला. या वेळी वाकड पोलीस व सांगवी पोलीस तैनात होते.  रहाटणी व पिंपळे सौदागर परिसर हा नेहमी गजबजलेला असतो. या परिसरात शहराच्या तुलनेने बँका, मॉल, हॉटेल, एटीएम सर्वात जास्त आहेत. मात्र सकाळपासूनच रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. अगदी रस्त्यावर उभे असणाऱ्या नागरिकही भीमा कोरेगाव घटनेच्या विरोधात घोषणा देत होते. या मोर्चाचे नेतृत्व अरुण चाबुकस्वार, मोहन भालेराव, विशाल भालेराव, बी. एस. कांबळे, राजू भालेराव, दीपक भालेराव, शांताराम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.

टॅग्स :rahatniरहाटणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड