शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

PCMC: जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी पालिका जळीत कक्ष स्थापन करणार

By विश्वास मोरे | Updated: December 15, 2023 18:18 IST

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली ...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने जळीतग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत प्रस्तावित जळीत कक्षाची संभाव्य जागा, दर्जा आणि क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रस्तावित जळीत कक्षात आगीमुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिका रुग्णालयांच्या संरचनेमध्ये फेरबदल, नूतनीकरण किंवा सुधारणा करण्यात येणार आहे. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठीही गुंतवणूक करण्यात येणार असून रुग्णांना पाठपुरावा आणि पुनर्वसन सेवा देखील पुरविली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जळीत कक्षाच्या प्राथमिक खाटांची क्षमता १५ ते ३० असण्याची शक्यता आहे. खाटांच्या क्षमतेबाबत पुढील आढावा बैठकीत सविस्तर निर्णय घेण्यात येणार असून जळीत कक्षासाठी निवडलेल्या स्थळांची पाहणी आयुक्तांकडून करण्यात येणार आहे. महापालिकेने आगीमुळे होणाऱ्या दुखापतींच्या समस्येकडे लक्ष देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असून जळीत कक्षाद्वारे पीडितांना उपचार, विशेष काळजी आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक आघातातून सावरण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका