शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

PCMC: पिंपरी-चिंचवडमधील ४२६ आस्थापनांना पालिकेचा दणका, २ हजार ४२३ मालमत्ता धोकादायक

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 31, 2024 18:57 IST

पिंपरी : अग्निसुरक्षेच्या बाबतीत नियमांचे पालन न केल्याबद्दल महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ४२६ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वेक्षणाद्वारे अग्निप्रतिबंधक ...

पिंपरी : अग्निसुरक्षेच्या बाबतीत नियमांचे पालन न केल्याबद्दल महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ४२६ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वेक्षणाद्वारे अग्निप्रतिबंधक यंत्रणांची पूर्तता न करणाऱ्या आस्थापना मालकांवर कारवाई करण्यात येत असून अनेकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने महिला बचतगटांच्या मदतीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ हजार ९२५ व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा उपायांबाबत अपूर्ण माहिती सादर केली होती. त्यानंतर परत त्यांच्याकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. अग्निसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याची पहिली पायरी म्हणून महापालिकेने नोटिसा पाठवण्यास सुरू केल्या आहेत.

महिलांद्वारे आस्थापनांचे सर्वेक्षणमहिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे अंतर्गत अधिकृत स्वयं-सहायता गटातील महिलांद्वारे शहरातील विविध आस्थापनांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणांतर्गत व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सर्वेक्षण केलेल्या सुमारे ४३ हजार मालमत्तांपैकी २४२३ धोकादायक मालमत्ता सापडल्या आहेत. उर्वरित मालमत्तांच्या अग्निसुरक्षेबाबतच्या पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. लायसन्सप्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र महापालिका अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. याची संपूर्ण जबाबदारी त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणाऱ्या भोगवटादाराची आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक, मिश्र इमारती यांचे मालक, भोगवटादार यांना अग्निसुरक्षिततेच्या अनुषंगाने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

- मनोज लोणकर, उपायुक्त, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका