शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:43 IST

महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीवर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो.

पिंपरी  - महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीवर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. दंडावर सवलतीची अभय योजना राबविली आहे. आॅक्टोबर महिन्यात थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर जमा करणाऱ्या मिळकतधारकांना ७५ ते ९० टक्के दंड माफ केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.महापालिकेच्या वतीने मिळकतकराची वसुली केली जाते. महापालिका क्षेत्रात १६ विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. तिथे मिळकतकर जमा केला जातो. सन २०१०-२०११पासून थकीत मिळकतकरावर आॅक्टोबर आणि जानेवारीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. वर्षानुवर्षे मालमत्ता बंद असल्याने, मालक व भाडेकरू वाद, तसेच कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरण, रस्ता रुंदीकरणामध्ये पूर्ण किंवा काही प्रमाणात पाडलेली मालमत्ताआणि आर्थिक परिस्थिती आदी कारणांमुळे मिळकतकर भरला जात नाही. परिणामी कराची थकबाकी वाढत आहे.अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरावा. या अभय योजनेच्या प्रसिद्धीसाठी करसंकलन विभागातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.’’ मिळकतधारकांना १५ आॅक्टोबरची मुदतथकीत मिळकतकर वसूल व्हावा म्हणून महापालिकेने या दोन टक्के दंडाच्या रकमेत सवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत भरणाºया नागरिकांना दंडामध्ये ९० टक्के सूट दिली जाणार आहे, तर ३१ आॅक्टोबर या कालावधीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणाºया नागरिकांना दंडात ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या संदर्भातील विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकर