शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पवना बंद जलवाहिनी : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:22 IST

पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना बंद जलवाहिनी योजनेस विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी आंदोलकांचा जीव गेला. ९ आॅगस्ट २०११ ला घडलेल्या या घटनेस सहा वर्षे पूर्ण झाली असून, ४७ आंदोलकांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलकांच्या प्रयत्नांना यश येत आहे. शासन स्तरावर गुन्हे मागे घेण्याविषयीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता़ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत भेट घेतली . त्यावेळी गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयी त्यांनी दुजोरा दिला होता. दरम्यान, येत्या १२ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांवर बैठक घेणार आहेत. यावेळी पवना आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंद जलवाहिनी विरोधात बऊर फाट्याजवळ २०११ ला पुणे मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते.त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. आंदोलनाला हिंसक वळण लागले. गोळीबारात कांताबाई ठाकर (वय ४०), मोरेश्वर साठे (वय ४०), श्याम तुपे (वय २९) हे तीन आंदोलक मृत्युमुखी पडले. काही जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन शेतकºयांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ४७ आंदोलकांना अटक केली होती. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर अद्यापही सुनावणी सुरू आहेत.तोडगा काढण्याविषयी विचारविनिमयराज्य शासनाने मृत शेतकºयांचे वारसदार तसेच आंदोलनात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत दिली. मृत शेतकºयांच्या कुटुंबातील व्यक्तींना महापालिकेत सामावून घेतले. परंतु आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. ही आग्रही मागणी होऊ लागली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून शासन स्तरावर त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असून गृह खाते त्यांच्याकडे असल्याने तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी येणाºया काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात कशी करता येईल, यादृष्टीने विचारविनिमय सुरू आहे.