शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरण ५० टक्के भरले : पाणीप्रश्न सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 02:15 IST

दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले

पिंपरी : दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले असून, वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.मावळात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र दहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मि़मी़ तर लोणावळा शहरात ऐंशी मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ आणि मुळशी परिसरातील इंद्रायणी, पवना व मुळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यात सांगिसे पूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत मावळातील धरणे तुडुंब होण्याची शक्यता आहे. पावसासोबत वारा असल्याने शहरात तसेच मावळात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. रावेत, किवळे भागातही पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.लोणावळ्यात सरासरी ओलांडलीजून महिना संपला तरी सुरू न झालेला मॉन्सून जुलै महिन्यात लोणावळ्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात आज अखेर १८१० मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर हा आकडा १७६५ मि़मी़ होता. 

टॅग्स :Damधरणnewsबातम्या