शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर अ‍ॅकॅडमीसाठी ‘पॅव्हेलियन’, प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:40 IST

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून, एकूण ७९ विषय विषयपत्रिकेवर असून त्यात थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून, एकूण ७९ विषय विषयपत्रिकेवर असून त्यात थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद शशांक फडके यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. कोट्यवधींचे विषय समितीसमोर येणार आहेत.स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्टÑवादीसह विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर विकासकामे होत नसल्याचा आरोप केला होता. विकासकामांना खोडा घातल्याचा आरोप केला होता. मात्र, मागील दोन आठवड्यापासून विकासकामांचे विषय समितीसमोर येऊ लागले आहेत. समाविष्ट गावांच्या आरक्षणांचा विकास, रस्ते तयार करण्याचे विषय मंजूर झाल्यानंतर उद्याच्या बैठकीसमोर कोणते विषय आहेत, याबाबत उत्सुकता आहे. त्यात स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, जलनिस्सारण असे विविध विभागांचे विषय समितीसमोर असणार आहेत. तसेच पेव्हिंग ब्लॉक, शाळा बांधणे, रस्ते डांबरीकरण असे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच महापालिका भवनाचेही सुशोभिकरणाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. थेरगाव येथे पिंपरी पालिकेची दिलीप वेंगसरकर अ‍ॅकॅडमी आहे. पेव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी फडके यांची वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदापूर्वक कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या सव्वा टक्का व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या पाऊन टक्के अशाप्रकारे एकूण दोन टक्के तसेच अंतर्गत सजावटीच्या कामासाठी निविदापूर्व कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या पाऊण टक्के व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या अर्धा टक्के अशाप्रकार सव्वा टक्के व निविदा पश्चात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून पावणेदोन टक्के रक्कम देण्यात येणार आहे.स्थापत्यविषयक कामांवर भरअहवालांचे अवलोकन करणे, व्यायामशाळा भाडेतत्त्वाने देणे, दीडशे ट्रॅफिक वॉर्डन नेमणे, महापालिकेच्या मिळकतींच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची निवड करणे, तसेच रखवालदारांचे मदतनीस नेमणे, ४१ स्मशानभूमींमध्ये काळजीवाहक नियुक्त करणे, नाला दुरुस्ती, संत तुकारामनगरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील लिकेज काढणे, वॉटरप्रूफिंग करणे, लांडेवाडी भोसरीतील रस्त्यावर जॉगिंग ट्रॅक उभारणे, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे.शिवतेज नगरात डांबरीकरण करणे, चिखलीत सीमाभिंत बांधणे, मोरे वस्तीतील रस्ते दुरुस्ती, जलनिस्सारण वाहिन्या टाकणे, चिखलीत मैला शुद्धीकरण केंद्र पंप हाऊस देखभाल दुरस्ती, मोशातील रस्ते, स्मशानभूमी बांधणे, वैदुवस्ती जवळकरनगर येथे खेळाच्या पट्यांचे डांबरीकरण करणे आदी विषय समितीसमोर येणार आहेत. तसेच कासारवाडीत नवीन शाळा बांधण्यात येणार आहे. त्यासाठीच्या तेरा कोटींचा विषय समितीसमोर चर्चेला येणार आहे.पिंपरी महापालिकाइमारतीचे सुशोभीकरणपिंपरीतील महापालिका भवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाकडून हा विषय समितीसमोर ठेण्यात आला आहे. सत्तर लाखांची निविदा होती. त्यापैकी सव्वासोळा टक्के दराने कमी अशी ५८ लाखांची निविदा करारनामा करून घेण्यास मान्यतेसाठी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका भवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्य इमारतीच्या गच्चीवर ५२ लाख रुपये खर्चून सोलर पॅनेल बसविणार आहेत.