शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान जोरात... पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:13 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला. 

ठळक मुद्देजलपर्णी मुक्त पवनामाई-उगम ते संगम अशा सुरु केलेल्या अभियानाचा हा चौथा आठवडापवना नदीपात्रातून काढण्यात आली आज अखेर ७० ट्रक जलपर्णी : प्रदीप वाल्हेकर

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांनी सुरु केलेल्या पवना नदी स्वच्छतेच्या 'उगम ते संगम' या स्तुत्य उपक्रमाला महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही सहभाग घेतला. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटाराव वाल्हेकर यांनी जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई-उगम ते संगम अशा सुरु केलेल्या अभियानाचा हा चौथा आठवडा आजचा ३५वा दिवस आहे. यामध्ये रोज ३५ ते ४० मजूर अभियानात काम करत असताना प्रत्येक रविवारी विविध एन. जी. ओ. व निसर्ग प्रेमी आणि लोक सहभागातून हे अभियान जोराने पुढे जात आहे. रोटरीचे सर्व सदस्य, वाल्हेकरवाडी ग्रामस्थ आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व निसर्ग प्रेमी व रानजाई प्रकल्पातील मजूर यांनी आज ही पाच ट्रक जलपर्णी नदीबाहेर काढून हे अभियान पूर्णत्वास नेले. यावेळी महापालिका आयुक्तांनी स्वत: नदी पात्रातील जलपर्णी काढली व प्रकल्पाची माहिती घेऊन प्रकल्पाचे व रोटरी क्लब आॅफ वाल्हेकर वाडी यांचे कौतुक केले. या उपक्रमास नगसेविका संगिता भोंडवे यांनीही सहभाग नोंदवला होता. तसेच भोंडवे यांनी त्यांच्या महिला बचत गटातील इतर महिलाही आम्ही या उपक्रमाता सामील करु असे आश्वासन दिले. तर एकनाथ पवार यांनीही प्रकल्पाची पाहणी करुन महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी हमी त्यांनी दिली. प्रकल्पाबद्दल बोलताना रोटरी अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर म्हणाले, की दिवसेंदिवस लोकसहभाग वाढत असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण आपली नदी आपणच स्वच्छ केली पाहिजे ही भावना लोकांमध्ये मूळ धरत आहे हे महत्त्वाचे आहे. शिवाय महापालिकेनेही आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच पवनामाई उगम ते संगम स्वच्छ व सुंदर होईल, अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकर वाडी यांच्या पुढाकाराने १९ नोव्हेंबरपासून पवनामाई स्वच्छता-उगम ते संगम या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानुसार चौथ्या रविवारी म्हणजे आज अखेर ७० ट्रक जलपर्णी पवना नदीपात्रातून काढण्यात आली असून रोवेत बंधारा ते चिंचवड मोरया गोसावी घाट असा एकूण ६ किमी चे नदी पात्र जलपर्णीमुक्त झाले आहे. यासाठी रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, मोरेश्वर भोंडवे मित्र परिवार, पीसीसीएफ, रानजाई, सुनील शेळके फाऊंडेशन अशा २२ सामाजिक संघटना, खासगी कंपन्या, महिला बचतगट यामध्ये सामील झाल्या असून आता लोकप्रतिनीधी व प्रशासनानेही सहभाग नोंदवायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड