शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजारांनी रुग्णालयांत वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:07 IST

क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण : वायसीएम प्रशासनावर अतिरिक्त ताण

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. बदलत्या वातावरणामुळे डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया या आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे. या जीवघेण्या आजारांमुळे शहरातील चव्हाण रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. खाटांची क्षमता कमी पडत असल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

वायसीएम रुग्णालयामध्ये ७५० खाटांची क्षमता आहे. रुग्णालयाच्या काही विभागामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याने खाटांची क्षमता अपुरी पडत आहे. शहरामध्ये आजारांची साथ आल्याने नागरिकांना हिवताप, सर्दी, खोकला व इतर जीवघेण्या आजारांची लागण होत आहे. उपचारासाठी अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये भरती होत आहेत. पावसाळ््यामुळे डेंगीचा प्रादुर्भावही वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

मागील एक महिन्यापासून रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच शहरातील विविध रुग्णालयांचे विस्तारीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील रुग्ण उपचारासाठी वायसीएममध्ये येतात. परिणामी वायसीएममध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाल्याने वायसीएम प्रशासनाची उपचार करत असताना दमछाक होत आाहे. डेंगीचे डास वाढणार नाहीत यासाठी पाण्याच्या टाक्या, हौद व पाणी साठविण्याची भांडी रोज कोरडी करावी. घरातील मोठ्या टाक्यांना झाकण बसवावे. फ्लॉवरपॉट, कुलर, फ्रीज ट्रेमधील पाणी बदलावे. कामाच्या ठिकाणी व घरामध्ये डास चावणार नाही याची दक्षता घ्यावी. घर परिसरातील भंगार मालाची विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

गेल्या महिन्याभरापासून आजारांचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये अनेक साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्यामुळे वायसीएममध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. ७५० खाटांची क्षमता आहे. मात्र त्यापेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण येत आहे. तसेच काही रुग्णांना डिस्चार्ज देऊन नवीन रुग्णांना भरती केले जात आहे.    - मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, वायसीएम रुग्णालय

 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड