शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र झाले वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 02:28 IST

रुग्ण आणि नातेवाइकांची कुचंबणा, प्रशासनाचे दुर्लक्ष

कामशेत : कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रांगण नागरिकांसाठी पार्किंगचे केंद्र बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात़ याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णाला अथवा रुग्णवाहिका रुग्णालयात येण्यास अडथळा निर्माण होत आहे.कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनचालक आपली वाहने पार्क करून जातात़ त्यामुळे रुग्णालयाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक काही तरुणांनी येथील फोटो काढून आपली गाडी दिवसभर सुरक्षित व विनामूल्य पार्क करायची असेल तर ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधा, असा उपहासात्मक संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अशीच अवस्था आहे. काही नागरिक बिनदिक्कत येथे दिवसभर आपली चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करतात. ही वाहने नक्की कोणाची याची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली असता याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. नोकरदार वर्ग, स्थानिक नागरिक, व्यावसायिक व इतर अनेकजण आपले वाहन सुरक्षित व उन्हापासून बचावासाठी कान्हे येथील सरकारी रुग्णालयाच्या आवारात पार्क करतात. सकाळी सकाळी रुग्णालय सुरू होण्याआधी पार्क केलेले वाहन रात्री उशिरापर्यंत येथेच असते. त्यामुळे कर्मचाºयांना व रुग्णांना आपली स्वत:ची वाहने गेटच्या बाहेर लावावी लागतात.कान्हे व कामशेत या दोन्ही ठिकाणी सरकारी दवाखान्यांना लोखंडी गेट आहे. मात्र हे गेट कायम उघडेच असते. सुरक्षारक्षक नसल्याने बाहेरच्या वाहनचालकांचे चांगलेच फ ावले आहे़ गेट वरती सुरक्षारक्षक असेल तर या समस्येपासून रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांची सुटका होईल़ सुरक्षारक्षकाची नेमण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड