शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’चा पंचनामा, महापालिकेची हेल्पलाइन कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:56 IST

नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्यांचे निराकरण चोवीस तासांत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सारथी ही हेल्पलाइन सुरू केली होती.

पिंपरी : नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा, त्यांच्या अडीअडचणी समस्यांचे निराकरण चोवीस तासांत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सारथी ही हेल्पलाइन सुरू केली होती. परंतु सारथीवरील आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत नसल्याच्या तक्रारी सत्ताधाºयांकडे आल्या होत्या. महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांनी महापालिका सारथी हेल्पलाइन विभागात अचानक भेट दिली. तक्रारींची तपासणी केली.सारथीविषयी महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी अधिक आल्या आहेत. त्यामुळे महापौर आणि पक्षनेत्यांनी आज अचानकपणे सारथी विभागास भेट दिली. या वेळी नगरसेवक नामदेव ढाके, महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नीळकंठ पोमन उपस्थित होते.तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या सारथीला अवकळा आली आहे. त्यांच्या बदलीनंतर मात्र राजीव जाधव, दिनेश वाघमारे या आयुक्तांनी सारथीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा न होणे, कर्मचारी दुर्लक्षामुळे सारथी निरूपयोगी ठरली होती. सारथीवर आलेल्या तक्रारी न सोडविताच त्या बंद करण्याचे प्रमाण अधिकाºयांकडून वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे.नागरिकांकडून आलेल्या तक्रारी न सोडविताच त्या बंद असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी पवार यांनी सारथीच्या तक्रारींची तपासणी केली. पक्षनेते पवार म्हणाले,‘‘सारथीचे आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात एखादा अधिकारी सारथीवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या अधिकाºयांवर कडक कारवाई होणार आहे. तसेच अशा कामचोर अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करणार आहे.’’>अधिकाºयांना दिली तंबीसारथीवर तक्रार करणाºया काही तक्रारदारांना फोन करून त्यांच्या तक्रारीची उलट तपासणी केली आहे. प्रत्येक तक्रारदाराने नोंदविलेल्या मतासह दर आठवड्याला पक्षनेत्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. यापुढे नागरिकांच्या तक्रारी वेळेत निरसन करण्याची तंबी संबंधित अधिकाºयांना दिली. दरम्यान, दक्षता व नियंत्रण विभागाकडून अधिकाºयांनी बंद केलेल्या तक्रारींची उलट तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.