शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा फजली आंबा पिंपरी बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:26 IST

लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमधील फळ बाजारामध्ये पाकिस्तानचा फजली आंबा दाखल झाला आहे.

पिंपरी : लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमधील फळ बाजारामध्ये पाकिस्तानचा फजली आंबा दाखल झाला आहे. मोसमातील सर्वात शेवटचा आंबा म्हणून फजली आंब्याची ओळख आहे. हा आंबा दाखल झाला असून, शौकीन ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे.राज्यामध्ये फजली आंबा आॅगस्टनंतरच दाखल होतो. सप्टेंबरमध्ये या आंब्यांची आवक वाढली असून, ग्राहकांकडूनही त्याला मागणी मिळत आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत हा आंबा बाजारामध्ये विक्रीसाठी राहण्याची शक्यता असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. आंब्याच्या मोसमामध्ये सर्वांत शेवटी दोन जातीचे आंबे बाजारामध्ये येतात. त्यामध्ये डिंगा व चौसा या जातीच्या आंब्यांचा समावेश असतो. मुंबईतील काही व्यापारी पाकिस्तानमधून फजली आंबा खरेदी करतात. आंबा मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याच्या मागणीनुसार तो राज्याच्या इतर शहरांमध्ये पाठवण्यात येतो. सद्य:स्थितीत फजली आंब्याचे भाव ३५० ते ५०० रुपये प्रतिकिलो आहेत. फजली आंबा मोसम संपल्यानंतर बाजारामध्ये दाखल होतो. त्यामुळे त्याचे दर जास्त असतात. मात्र आंब्याची गोडी असणारे ग्राहक आंबा महाग असला तरी खरेदी करतात. ज्यांना हा आंबा पावसाळ्यामध्ये दाखल होतो हे माहीत असते ते या आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दुसऱ्या क्रमाकांच्या प्र्रकारामध्ये त्याचे वजन अंदाजे दीड किलो असते.>फजली आंबा महाग असला तरी अनेक शौकीन लोक खरेदी करतात. चवीमध्ये हा आंबा खूप मधुर असल्यामुळे मागणीही चांगली आहे. सध्या आवक कमी आहे. जशी ग्राहकांची मागणी असेल तसा आंबा मागवला जातो. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात त्याचे उत्पादन होते. - कुमार शिरसाठ, फळ विक्रेते.

टॅग्स :Mangoआंबा