शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामाचे पैसे न देणाऱ्या मालकाची दुचाकी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 00:01 IST

पिंपरी - चिंचवडमधील येथील घटना; कामगार पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्देअग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.

पिंपरी : कामाचे पैसे दिले नाही म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी पेटविली. याप्रकरणी कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी -चिंचवड लिंक रोडवर चिंचवड येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.अंकित शिशुपाल यादव (वय २७, सध्या रा. पिंपळे गुरव, मुळगाव उत्तर प्रदेश), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा मांजरी येथील गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला आहे. गणेश यांचा पिंपळे गुरव येथे सिमेंटचे ब्लॉक बनविण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात अंकित कामाला आहे. मालक गणेश यांनी त्यांची दुचाकी वापरण्यासाठी अंकित यादव याला दिली होती. मालक गणेश यांनी कामाचे ४० हजार रुपये दिले नाहीत, या कारणावरून अंकित यादव याला संताप अनावर झाला.

दरम्यान अंकित यादव हा रविवारी सायंकाळी चिंचवड येथे आला. मालकाने कामाचे पैसे दिले नाहीत, त्या रागाच्या भरात त्याने त्याच्याकडील मालकाची दुचाकी भर रस्त्यात जाळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.