शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाण्यास सर्वपक्षीय विरोध; पवना धरणात पुरेसा साठा असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:20 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली.

पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. त्या वेळी दिवसाआड पाणीपुरवठ्यास सत्ताधाºयांनी विरोध केला. पाणीपुरवठा सुरळीत करा, दिवसाआड करू नये, अशा सूचना प्रशासनास दिल्या. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे.महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला ४६० एमएलडी पाणीपुरवठा होता. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवक, नागरिक आणि सत्ताधाºयांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होऊ लागली असून, एकाही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले होते. त्यामुळे महापौरांनी महापालिकेत अधिकाºयांची आज तातडीने बैठक बोलावली होती.या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.- पिण्याच्या पाण्याच्या तक्रारींसंदर्भात आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याचा साठा किती आहे. याची माहिती घेतली. धरणात पुरेसा साठा असतानाही शहरातील नागरिकांच्या तक्रारी कशा काय येत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. तक्रारींची सोडवणूक व्हायलाच हवी. पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. धरणात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी करून नागरिकांना वेठीस धरू नका, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड