शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

विरोधी पक्षनेते साने की काटे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:36 IST

महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला. सत्ताधारी भाजपाविरोधात आक़्रमक भूमिका बजावू शकेल, अशा व्यक्तीला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदी संधी दिली जाणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने व विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत.

पिंपरी : महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला. सत्ताधारी भाजपाविरोधात आक़्रमक भूमिका बजावू शकेल, अशा व्यक्तीला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदी संधी दिली जाणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने व विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची नावे चर्चेत आहेत.महापालिकेत १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत पराभव झाला. १२८ पैकी राष्टÑवादी काँग्रेसचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले. भाजपाने महापालिकेची सत्ता काबीज केली. राष्टÑवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. परंतु, बहल सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्यात कमी पडले, अशा तक्रारी पक्षातील काहीजण नेत्याकडे करू लागले. सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांशी बहल यांची सलगी आहे, असेही आरोप झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ पासून विरोधी पक्षनेता बदलाच्या हालचालींना वेग आला होता.विरोधी पक्षनेतेपदी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण नेत्यांनी आखले आहे. माझा एक वर्षाचा कालखंड मार्चमध्ये पूर्ण झाला आहे. इतरांना संधी मिळावी, या उद्देशाने राजीनामा दिला आहे. या पदावर चांगले काम करेन, असा विश्वास दाखवून पक्षाने काम करण्याची संधी दिली, त्यानुसार या पदाची जबाबदारी पेलली आहे. कोणीही राजीनाम्यासाठी तगादा लावला नव्हता, स्वत:हून राजीनामा दिला आहे. - योगेश बहलविरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक दत्ता साने व नाना काटे यांच्या नावे चर्चेत आली. अलीकडे माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी महापौर वैशाली घोडेकर व जावेद शेख यांनीही विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्यास इच्छुक असल्याचे मत नेत्यांकडे व्यक्त केले आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणाºया अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारण