शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत कचऱ्यावरून प्रशासन धारेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 13:47 IST

रस्त्यावरील खड्डे आणि कचºयांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली.

ठळक मुद्देनगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा; खड्डे दुरुस्तीची मागणी

पिंपरी : प्रभागस्तरावरील अडचणी व विकासकामांबाबतचा आढावा घेण्यासाठी क प्रभागात बैठक झाली. प्रभाग समितीत कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. रस्त्यावरील खड्डे आणि कचºयांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. ‘‘शहरातील विविध ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावावे व कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या व फेऱ्या वाढाव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले.प्रभाग समितीच्या बैठकीला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, नगरसदस्या नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, सागर हिंगणे, वैशाली खाडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफळे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, रवींद्र पवार, नितीन देशमुख, प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर,आर. एम. घुले, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.महापौर राहुल जाधव म्हणाले,‘‘कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फेऱ्या वाढविणे, ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावणे, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेऊन सर्व शाळा स्वच्छ ठेवणेबाबत विशेष लक्ष द्यावे.’’ मोकळ्या जागांवर कुंपणालगत वृक्षलागवड करण्याबाबतच्या सूचनाही उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांना महापौरांनी दिल्या.......रस्त्यावरील खड्डे बुजवा , पदाधिकाऱ्यांना सूचना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले,‘‘कचरा वाहन मॉनीटरिंग करणारे अ‍ॅप विकसित करून सर्व नगरसदस्यांना द्यावे, जेणेकरून त्यांना प्रभागातील कचरा वाहक गाड्यांची सर्व माहिती मिळणे शक्य होईल. तसेच कचरा वाहनांच्या रूट प्लॅनचे पत्रक प्रभागातील नगरसदस्य, संबंधित अधिकारी यांच्या मोबाइल नंबरसह नागरिकांना घरोघरी वाटावे. कचरा वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात वृक्षलागवडीबाबत सर्व सदस्यांना माहिती द्यावी व अशा ठिकाणी नगरसदस्यांच्या भेटीचे नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे योग्य पद्धतीने तत्काळ बुजविण्यात यावेत.’’

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड