शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:00 IST

केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे.

ठळक मुद्देएआयडीएफ, इंटक व बीपीएमएसचा सहभाग संरक्षण विभागांचे खासगीकरण , नवीन पेन्शन योजना रद्द करण्यासाठी रॅली , सभा  

देहूरोड : केंद्र सरकारच्या संरक्षण उद्योगातील खाजगीकरण, नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेसह चुकीच्या  धोरणांचा विरोध करण्यासाठी देहरोड व तळेगाव दाभाडे परिसरातील केंद्रीय संरक्षण विभागातील विविध आस्थापनांतील कामगारांच्या एआयडीएफ, इंटक व बीपीएमएसच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने देहूरोड परिसरातून रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला कामगारांचा मोठा प्रतिसाद लाभला.    केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे. तसेच सन 2004 नंतर भरती झालेल्या संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली असून जुनीच पेन्शन योजना कामगार हिताची असल्याने नवीन योजना तातडीने रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी सर्वच कामगार संघटना करीत असून विविध कामगार संघटनांच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाल्यानुसार सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोघात देहूरोड येथील एम बी कॅम्प , शंकर मंदीर, पुणे-मुंबई महामार्ग , सुभाष चौक व देहूरोड बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नेहरु मंगल कार्यालयापर्यंत संबंधित सर्व सहभागी कामगार संघटनांच्या सयुंक्त कृती समितीने रॅली काढली होती. रॅलीत मोठया संख्येने सहभागी झालेल्या कामगारांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली . पंडीत नेहरु मंगल कार्यालयासमोरच्या मैदानात सभा घेण्यात आली . सभेत देहूरोड विभागातील संरक्षण कामगार प्रतिनिधी  निस्सार शेख यांनी प्रास्तविक केले. बीपीएमएसचे प्रतिनिधी  प्रल्हाद नवगिरे, इंटकचे प्रतिनिधी प्रमोद जोशी,  एआयडीएफचे प्रतिनिधी योगेश कोंडाळकर आदींनी सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत , खाजगीकरण व पेन्शन योजनेबाबत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची माहिती देऊन चुकीचे धोरण रद्द करण्यार्चा मागणी केली. पंडित बालघरे यांनी आभार मानले.

टॅग्स :dehuroadदेहूरोडPuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकार