शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत पुणेरी पाट्या अनुभवण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 04:08 IST

आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’, ‘आमचं कुत्रं ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या की तुम्ही नक्की पुण्यातच आहात, हे सुज्ञास सांगणे न लगे!

पिंपरी : ‘आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’, ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमची कोठेही शाखा नाही’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’, ‘आमचं कुत्रं ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या की तुम्ही नक्की पुण्यातच आहात, हे सुज्ञास सांगणे न लगे!पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती.पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आयोजित मेन्स अ‍ॅव्हेन्यूच्या सहयोगाने रविवार आणि सोमवार ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित केले आहे.राहुल कलाटे, राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज भोसरी हे सहप्रायोजक आहेत. आईस्क्रीम पार्टनर ‘खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी’, आऊटडोअर मीडिया पार्टनर धीरेंद्र, व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन आहेत.पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचे धाडस दाखवतो. चपखल शब्दांमधून मार्मिक टिपण्णीही झळकते याच पाट्यांमधून! याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही आणि जात-पंथ-वर्णभेद तर मुळीच नाही. अगदी लहान वयाचा एखादा मुलगाही मार्मिक शब्दांत भला मोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो असे म्हणू शकतात.पुणेरी काकू एखाद्याची अशी खिल्ली उडवतील की हास्याचे फवारे उडतील व आजीही नव्या पोरींची अशी फिरकी घेतील, की त्या लाजून चूर होतील. चेष्टा करावी तर त्यातही काही टॅलेंट असावे ही दृष्टी पुणेरी पाट्यांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकराची तैलबुद्धी दाखवतात व त्याचा खास पुणेरी बाणाही! इथला रिक्षावालाही रिक्षाच्या मागे चिकटू नका, मार बसेल असे लिहून जातो. तर एखादा मालमोटार चालक तेरा मेरा साथ असे १३, मध्ये मेरा व नंतर ७ असे अंकात लिहून मजा आणतो.- पुणेरी इरसाल पाट्या म्हणजे पुणेकरांचा अभिमान आहे. पुण्याची संस्कृती पुणेरी शैलीत खुमासदार पद्धतीने सांगणारे ते प्रतीक आहे. अशा पाट्या लिहिण्यासाठी आपल्या संस्कृतीचा, वैभवशाली इतिहासाचा जाज्वल्य अभिमानच असावा लागतो. कुत्र्यापासून सावध राहा ऐवजी ‘सावधान, कुत्रा चावरा आहे’ असेही इथेच लिहितात. बेल एकदाच वाजवावी, जिना चढताना आवाज करू नये, दरवाजासमोर वाहने लावल्यास पंक्चर केली जातील अशा मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते. पुण्याशिवाय अन्यत्र कुठे हा अनुभव येणार नाही.

 

टॅग्स :Puneपुणे