शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या.

थेरगाव - पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या. त्यामुळे वाहतुकीला व पीएमपी बसला अडथळा निर्माण होऊन वाहतूक खोळंबण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.याबाबत दि. ७ जून रोजी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत येथे थांबणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बीआरटीएस मार्ग मोकळा झाला आहे.केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अर्थात ‘बीआरटीएस’चे जाळे निर्माण केले. त्यासाठी किवळेतील मुकाई चौक ते औंध दरम्यान बीआरटीएस मार्ग सुरू करण्यात आला आहे; पण रिक्षाचालकांनी डांगे चौकात वाकड फाट्यावर या मार्गात अनधिकृत रिक्षा थांबा तयार केला होता. येथे थांबलेल्या रिक्षांचा पीएमपी बसला अडथळा होत होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे येथे रिक्षा थांबविण्याचे प्रकार बंद झाले आहेत.डांगे चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. नागरिकांच्या सोई सुविधेसाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने पीएमपी बससाठी बीआरटीएस मार्ग उभारण्यात आला आहे. डांगे चौकासह शहरात अनेक ठिकाणी बीआरटीएसच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केलेले आहेत. परिणामी, वाहतुकीला आणि पीएमपी बसला अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या