शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री, मागणीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:26 IST

आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.  

-   स्वप्नील हजारे 

पिंपरी-चिंचवड : आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.  देशभरात खेड्यांसह शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी पेटवून मनोभावे अग्नी देवतेची पूजा केली जाते. होळीच्या ठिकाणी सुवासिनी नैवेद्य दाखवतात. वर्षानुवर्षे या सणाचे महत्त्व टिकून आहे. वाईट विचार नष्ट करून चांगल्या विचाराचा अंगीकार करणे या भावनेतून होळीचा सण साजरा केला जातो.     होळीसाठी लागणा-या साहित्याची विशेष म्हणजे गाईच्या शेणापासून बनविण्यात येणा-या गोव-यांना फार महत्त्व असते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना गोव-या उपलब्ध होत नाही. विविध वस्तूंची आॅनलाईन विक्री करण्यात अग्रेसर असणा-या काही कंपन्यानी चक्क गोव-यांची आॅनलाईन विक्री सुरू केली आहे. होळीप्रमाणेच धार्मिक विधी, होमहवन याकरिता गोव-यांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन काही कंपन्यानी आॅनलाइन गोव-या विक्रीची जाहिरात केली आहे. 

खेड्यातील गोव-यांना मागणी... खेड्यामध्ये घरोघरी शेतक-याकडे गाई, म्हशी असतात. या जनावरांच्या शेणापासून गोव-या तयार करून स्वंयपाकासाठी इंधन म्हणून वापरात आणल्या जातात. उन्हाळ््यात घराच्या आवारात अथवा शेतात महिलावर्ग शेणाच्या गोव-या थापतात. ऐन पावसाळ््यात साठा केलेल्या गोव-यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर होतो. या गोव-यांना आॅनलाइनच्या बाजारपेठेत एवढे महत्व येईल, असे शेतक-यांना कधीच वाटले नव्हते. परंतु आता शेतक-यांकडील गोव-यांना चांगलाच भाव आला आहे.

नऊ गोव-यांसाठी १५० रुपये...गोव-याची नगाने विक्री होत आहे. नऊ गोव-याची किंमत दीडशे ते दोनशे रूपये असून या गोव-याची काही दिवसात होम डिलीवरी मिळण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. विविध कंपनीच्या संकेतस्थाळावर गोव-याची किंमत वेगवेगळी असली, तरी आॅनलाइन गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-याची विक्री होतेय, हे नवल राहिलेले नाही. विशेष म्हणजे आकर्षक पॅकिग असणा-या विविध आकारातील गोव-यांना आॅनलाइन ग्राहकही मिळू लागला आहे. शहरात सर्वकाही आॅनलाईन आणि घरबसल्या खरेदी करणारा ग्राहक आता गोव-याही आॅनलाइन खरेदी करू शकणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड