शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

किरकोळ कारणावरून पिंपरीतील चिखलीत एकाचा भोसकून खून; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:20 IST

दोघांनी चिखलीत एका युवकावर चाकू हल्ला केला. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकाचा त्यात जीव गेला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देएका युवकावर चाकू हल्ला, एक जण गंभीर जखमीसानेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली घटना

पिंपरी : तू माझ्याकडे का बघतो आहेस, अशी विचारणा करीत दोघांनी चिखलीत एका युवकावर चाकू हल्ला केला. हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकाचा त्यात जीव गेला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सानेवस्ती, चिखली येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश निवृत्ती पाटील (वय २५, रा. साने चौक) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तर अतुल अनिल गाडे वय (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी समाधान रामदास मोरे (वय २४, मूळ रा. चाळीसगाव, जि. जळगाव) चेतन रामदास मोरे (वय २०) या आरोपीना अटक केली आहे. ते दोघे सख्खे भाऊ आहेत. दिनेश, अतुल, समाधान व चेतन हे चौघेही जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अतुल हा शुक्रवारी रात्री इमारतीच्या खाली उभा होता. मोबाईलवर बोलत असताना समाधानने त्याच्याकडे पहिले, त्यावेळी अतुलने माझ्याकडे का पाहतोस असे विचारले, त्याचा राग आल्याने मोरे बंधू दुसऱ्या मजल्यावरून खाली आले. या तिघांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद सुरू झाला. आवाज ऐकून समोरच्या इमारतीत राहणारा दिनेश पाटील खाली आला. तो वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करू लागला, त्यावेळी मोरे बंधूंनी दिनेश व अतुल या दोघांवर चाकू हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. यापैकी दिनेश याचा शनिवारी उपचारादरम्यान  मृत्यू झाला. तर अतुल याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दिनेश व अतुल खासगी कंपनीत काम करतात. तर मोरे बंधू चप्पलच्या दुकानात कामाला आहेत. चौघेही सानेचौक मोरेवस्ती येथे चाळवजा इमारतीत  सध्या राहत आहेत. सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.पिंपरी चिंचवडमध्ये खूनसत्र सुरु असून किरकोळ कारणावरून घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड