शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा महिन्यात भरले पवना धरण शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:26 IST

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण महिनाभरात शंभर टक्के भरले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण महिनाभरात शंभर टक्के भरले असून, उद्योगनगरीची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मावळातील सर्वच धरणे भरली आहेत. पवना धरण भरले असतानाही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न कायमच आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.मुळशी, खेड आणि मावळ परिसरात यंदा पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. जूनच्या सुरुवातीस पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, सात जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत पवना धरण परिसरात तीन मि़मी़ पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून २२२० मि़मी़ पाऊस पडला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्याने भुशी, वडिवळे, कासारसाई, भामा आसखेड ही धरणे फुल झाली आहेत. लोणावळ्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला. अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. पवना धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांच्यापुढे गेल्याने सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.धरणातील पाण्याची पातळी ही केवळ वीस दिवसांत वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक पाऊस वीस दिवसांत पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. सात जुलैला ३० टक्के असणारे धरणे शंभर टक्क्यांवर पोहोचले आहे. वीस दिवसांत ७० टक्के पाणीसाठा वाढला आहे. २० जुलैपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र धरण परिसरात जोर कायम असल्याने धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.>धरणातून विसर्ग सुरूपवनानगर : पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १००% भरले आहे. त्यामुळे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवना नदी पात्रात शुक्रवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू केला आहे. पवना धरण १००% भरल्याने मावळ परिसरातील शेतकऱ्यांसहपिंपरी-चिंचवड शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी आज अखेर पवना धरण ९८% भरले होते.