शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

PCMC: कारवाईच्या भीतीने पिंपरी-चिंचवडमधील दीड लाख नागरिकांनी भरला कर!

By विश्वास मोरे | Updated: June 5, 2023 13:26 IST

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख २ हजार २०३ मालमत्ता आहेत...

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने करवसूलीबाबत कडक धोरण स्विकारल्याने उत्पन्नात भर पडत आहे. अवघ्या दोन महिन्यांत दीड लाख मिळकतधारकांनी २०४ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. तर पंचवीस टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. त्यात निवासी मिळकतधारक अधिक असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ६ लाख २ हजार २०३ मालमत्ता आहेत. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप अशा विविध बाबींमुळे दोन महिन्यांत दोनशे कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. त्यापैकी १ लाख ६२ हजार मालमत्तांनी २०४ कोटी ६६ हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

असा आला करऑनलाईन - 151कोटी 96 लाख 28 हविविध अ‍ॅप - 2 कोटी 42 लाख 87 हरोख -  25 कोटी 85 लाख 83 हधनादेशाद्वारे - 16 कोटी 23 लाखइडीसी- 2 कोटी 39 लाखआरटीजीएस - 3 कोटी 42 लाख

कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी१ लाख ६१ हजार ३५९ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल १ लाख ४६ हजार ९१ निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर ११ हजार ६७५ बिगर निवासी, २ हजार ७८९ मिश्र, १ हजार ४५ औद्योगिक तर ९७४ मोकळ्या जमीन असणाºया मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये  वाकड झोनमध्ये सर्वाधिक २४ हजार ३९६6 जणांनी तर सर्वात कमी पिंपरी नगरमध्ये १ हजार ६२२ जणांनी कर भरला आहे.

कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधामालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि आॅनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यापूर्वी ज्या भागात मालमत्ता आहे त्याच भागातील कार्यालयात कर भरण्याची सुविधा होती. मात्र, विभाग प्रमुख सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी प्रथमच शहरातील कोणत्याही भागातील मालमत्ता धारकांना कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उदाहरणार्थ चिंचवडची व्यक्ती तळवडे कर संकलन कार्यालयात कर भरू शकते.

निरंतर जप्ती कारवाई, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण ही त्रिसूत्री विभागाला आखून दिलेली आहे.  त्यानुसार आमचा विभाग झोकून काम करत आहे. एक हजार कोटीशिवाय थांबायचे नाही असे ठरवले आहे. पुढील संपूर्ण वर्षाचे तारखेनिहाय सूक्ष्म नियोजन तयार केले असून, विभाग सातत्याने कार्यरत राहील.

- नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर