शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वा रे बहाद्दर ! नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदाई; महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 26, 2024 17:09 IST

नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात. या कामामुळे जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ वाया जातो.

पिंपरी : महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून, तसेच स्मार्ट सिटीकडून अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. काही भागातील कामे पूर्ण होत आली आहेत; पण जेथे रस्त्यांची कामे झाली आहेत, तेथेच पाणीपुरवठा, जलनिस्सारण व पथविभागाकडून पुन्हा रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे रस्ता खराब होत असून, कामासाठीच्या निधीचाही अपव्यय होतो. या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने असे प्रकार सुरू आहेत.

शहरातील विविध भागामध्ये स्मार्ट सिटीकडून रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून जलवाहिनी, जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये महापालिका-स्मार्ट सिटी व सर्व विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. समन्वय नसल्यामुळे, नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात. या कामामुळे जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ वाया जातो.

वारंवार होते खोदाई

महापालिका कंत्राटदारामार्फत रस्ता तयार करते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच कधी जलवाहिनीसाठी, कधी नैसर्गिक वायूसाठी, तर कधी वीज वाहिनीसाठी अशी वारंवार खोदाई होत राहते. सर्व विभागांचा महापालिकेशी समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे. समन्वयाच्या अभावामुळेच रस्त्याचा दर्जा घसरतो, तयार रस्ता खोदला जातो. मग त्यासाठी पुन्हा नवी निविदा काढली जाते.

 जेसीबीच कशासाठी?

पूर्वी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जिथे गळती वा काही अडचण असेल तिथे खोदाई करायचे; पण आता जेसीबी बोलवला जातो, त्याने मोठा खड्डा केला जातो. त्यावेळी आजूबाजूचे पाइप तसेच टेलिफोनच्या केबल तुटतात. त्याचा भुर्दंड वेगळाच असतो. ब्रेकरसारखी साधने असल्याने हवी तितकी व इतर सुविधांना धक्का न पोहोचवता खोदाई केली जाऊ शकते. त्याबाबतही महापालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय आहे. ज्या रस्त्यांचे काम करण्यात येणार असेल, तर त्याआधी संबंधित सर्व विभागांना काम करून घेण्याच्या सूचना देण्यात येतात. काही वेळेस अपरिहार्य कारणांमुळे ऐनवेळी काही खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी लागते. त्यामुळे रस्ता खोदाई करावी लागते. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या