शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:56 IST

हिंजवडीतील खासगी वसतिगृहात राहत असलेल्या अभियंता तरुणीच्या खोलीत शिरून विनयभंगाचा प्रयत्न करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी  - हिंजवडीतील खासगी वसतिगृहात राहत असलेल्या अभियंता तरुणीच्या खोलीत शिरून विनयभंगाचा प्रयत्न करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ९ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेची दखल २५ सप्टेंबरला घेण्यात आली. या प्रकाराबद्दल पोलीस आयुक्त आर. के. पद्नाभन यांनी संताप व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेºयात आरोपी कैद झाला असून, त्याचा शोध घेण्याचे आव्हान हिंजवडी पोलिसांपुढे आहे. तेथील एका पोलीस अधिकाºयाची आयुक्तांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. इतरांची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.महिलांच्या वसतिगृहात जाऊन तेथे राहणाºया तरुणींना काही अडचणी आहेत का, याबद्दलची माहिती घेण्यासाठी महिला पोलीस पथक पाठविण्याची मोहीम आयुक्त पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी हाती घेतली. त्यातून विनयभंगाच्या या गंभीर घटनेबद्दल पोलिसांनी कसा निष्काळजीपणा दाखविला, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली.विनयभंगाची घटना घडली आहे, मात्र पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल नाही. ही बाब समजल्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांना धक्का बसला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाºयांना पीडित तरुणीशी संपर्क साधून आपल्याशी बोलण्यास सांगा, असा निरोप दिला. पोलीस आयुक्तांनी सांगितले असताना, तेथील पोलीस अधिकारी त्यांना चुकीची माहिती देऊ लागले. त्या तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याशी संपर्क होत नाही, तिचा मोबाइल आऊट आॅफ रेंज असल्याने आपला निरोप पोहोचविणे शक्य होत नाही, असे सांगून या घटनेकडील आयुक्तांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.हिंजवडीतील या घटनेसंदर्भात तरुणीने वकिलामार्फत थेट पोलीस आयुक्तांनाच नोटीस दिली असल्याने आयुक्तांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले. हिंजवडीतील पोलीस अधिकाºयांकडून योग्य प्रकारे प्रतिसाद मिळण्याऐवजी टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी स्वत:च तक्रारदार तरुणीची भेट घेण्यास जाण्याचा निर्णय घेतला. हिंजवडीतील त्या वसतिगृहाच्या इमारतीत जाऊन त्यांनी संबंधित तरुणीशी चर्चा केली.पोलिसांनी तरुणीची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचे सांगत तक्रार देण्यास गेल्यानंतर तब्बल चार तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. तक्रार घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वकिलामार्फत आयुक्तालय कार्यालयास नोटीस पाठविणे भाग पडले, हे वास्तव तरुणीने पोलीस आयुक्त पद्मनाभन यांना सांगितले. हे ऐकून संतप्त झालेल्या आयुक्तांनी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांची तडकाफडकी बदली केली. या प्रकरणातील दोषींची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड