शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कोमात, इंग्रजी जोमात! महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:19 IST

राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. एकीकडे शासनाने मराठीची सक्ती केली आहे. तरीही मराठी शाळांचा टक्का कमालीचा घसरला आहे.

रहाटणी - राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. एकीकडे शासनाने मराठीची सक्ती केली आहे. तरीही मराठी शाळांचा टक्का कमालीचा घसरला आहे. अनुदानित मराठी शाळा, पालिकेच्या शाळांचे पट हाताच्या बोटावर मोजण्याइतपत खाली आले आहेत. एवढेच नाही तर शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अक्षरश: पेव फुटले आहे.शहरात सर्वात जास्त प्री प्रायमरीच्या शाळांचा सुकाळ झाला आहे. प्री प्रायमरीच्या शाळांची नोंदणी शिक्षण मंडळाकडे करायची नसल्याने उठसूट कोणीही असे वर्ग सुरू करून या शाळांमध्ये डोनेशन फीच्या नावावर पालकांची भरमसाठ लूट केली जात आहे. तरीही पाल्यांच्या भविष्याचा विचार करून पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अधिक वळत आहे. त्यामुळे इंग्रजी शाळा जोमात तर मराठी कोमात, असे चित्र सध्या दिसत आहे.आरटीई (सवलतीचा मोफत शिक्षणाचा कायदा) धाब्यावर बसवत शंभर टक्के शुल्काशिवाय शिक्षण नाही, असाच बाजार मांडला आहे. पालिकेच्या शाळा असो वा अनुदानित शाळा या केवळ शिक्षक, संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांना पोसण्यापुरता उरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात शिक्षण क्षेत्रातील बदल त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही. सहाव्या वेतन आयोगापर्यंत पगाराची आपसुक होणारी वाटचाल त्यांना सुस्तच करणारी ठरली की काय, असा प्रश्न पडतो. एकेकाळी शेकडोच्या घरात असणारी अनुदानित सर्वच शाळांची पटसंख्या आता दोन अंकी तर काही ठिकाणी एकेरी अंकावर येऊन ठेपली आहे. पालिकेच्या व काही अनुदानित खासगी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. याचे पालिका शिक्षण मंडळ अधिकारी व कोणत्याही पदाधिकाºयाला काही देणे घेणे असल्याचे दिसत नाही. याचा फायदा इंग्रजी आणि खासगी शाळांनी घेत चांगले बस्तान बसविले आहे. मराठीपेक्षा इंग्रजी बरी, अशी मानसिकता बळावल्याने इंग्रजी शाळा आणि शिक्षण संस्थांचा बाजार गेल्या काही वर्षांत चांगलाच फोफावला आहे. अलीकडे सीबीएसई अभ्यासक्रमांच्या शाळांचेही चांगलेच पेव फुटले आहे. अशा शाळांचे शुल्क म्हणजे पालकाचे अर्धे उत्पन्न घेणारे आहे. यामध्ये कॅपीटेशन फी, स्पर्धा फी, ट्यूशन फी, बुद्धिमता गुणवता परीक्षा फी, यासह विविध प्रकारच्या फी आकारण्यात येतात. नाईलाज असल्याने पालकही मुकाट्याने डोनेशन देत आहेत.शिक्षणाचा बाजारशिक्षण हे सामाजिक व्रत समजणाºया संस्थांची पाठराखण करणे गरजेचे आहे. उलट ज्या संस्थांनी शिक्षणाचा बाजार बनवून व्यावसायिकरण केले आहे़ त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शिक्षण विभागासह समाज सुधारकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा शिक्षणाचा बाजार आणखी फोफावला जाईल. त्यामुळे शिक्षणाचा सक्तीचा कायदा धाब्यावर आणि लुटारुंना कुरण मोकळे, अशी परिस्थिती निर्माण होईल. परिणामी मोफत शिक्षणाचे धोरण व मराठी शाळा नामशेष होतील, यात शंका नाही.आरटीई अंतर्गत प्रवेश नाही काही संस्था शासन आम्हाला पैसे वेळेवर देत नाही तुम्हाला आरटीई अंतर्गत प्रवेश देतो, मात्र आधी फी भरा शासन आम्हाला दिले की आम्ही फी तुम्हाला परत करतो, असे म्हणत काही संस्थाचालक पालकांना वेठीस धरत आहेत. तर काही संस्थाचालक तुम्ही राहण्यास फार लांब आहात त्यामुळे जवळची शाळा बघा, असे म्हणत प्रवेशास नकार देत आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सीबीएसई पॅटनच्या नावाखाली संस्थाचालक हजारो रुपये डोनेशन व वार्षिक फी उखळत आहेत.शिक्षकांना पगार कमीच  पगार कमी असल्याने आनेक शिक्षकएका वर्षात नोकरी सोडून दुसरीकडे जातात. मात्र हजारो रुपये डोनेशन घेणारे संस्थाचालक विद्यार्थ्यांच्या भविष्याचाविचारच करीत नाहीत. अनेक शाळांचे शिक्षण विभागाकडे नोंदणीही नाही़ तरी पालक अशा शाळांमध्ये मुलांना शिक्षणासाठी पाठवीत आहेत. इंग्रजी शाळांचा झगमगाट, ड्रेस कोड यामुळे पालकही इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. त्यामुळे इंग्रजी शाळा जोमात तर मराठी शाळा कोमात आसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड