शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड शहरात कॉलरा रूग्णांची संख्या सातवर; शनिवारी एकाच दिवशी आढळले चार रूग्ण

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 15, 2024 22:09 IST

भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली.

पिंपरी : महापालिकेकडून दूषित व गढूळ पाणीपुरवठा झाल्याने भोसरी परिसरातील तीन रुग्णांना पटकीची (काॅलरा) लागण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.४) चार जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर वायसीएम आणि भोसरी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रूग्णांची संख्या सातवर पोहचली असून सर्वच रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दूषित पाणीपुरवठा होऊन संबंधित परिसरातील रुग्णांना काॅलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे.२६ हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण पुुर्ण..

महापालिकेच्या वतीने दोन सदस्य असलेल्या ४४ टीम्स मार्फत घरोघरी साथरोगाचे सर्व्हेक्षण सुरू आहे. आतापर्यंत ९ हजार ७०५ घरामधून २६ हजार ५५१ नागरिकांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. तसेच संशयित नागरिकांचे नमुने घेवून प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना ओआरएस व औषधांचे वाटप केले आहे.धावडे वस्तीत फिल्ड दवाखाना...

संशयित रूग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने धावडे वस्तीतील भैरवनाथ शाळेत फिल्ड दवाखाना स्थापन करण्यात आला आहे. या दवाखान्यात संशयित रूग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास भोसरी रूग्णालयात पाठविण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना या विषयी माहिती व्हावी, यासाठी परिसरात पथनाट्य तसेच रिक्षावर माईक लावून जनजागृती करण्यात येत आहे. -डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य-वैदयकीय अधिकारी, महापालिका