शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:08 IST

पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात.

ठळक मुद्दे मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची १९ लाखांची निविदा; जुनपर्यंत त्याची मुदत महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची केली पाहणी

पिंपरी : जुनी सांगवी येथे मुळा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला चार दिवसात दोन वेळा नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसात जलपर्णी न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद आरोग्य विभागातर्फे दिली आहे, अशी माहिती माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीचे पात्र २४ , इंद्रायणीचे १९ आणि मुळा नदीचे १० किलोमीटर आहे. मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगवी, बोपखेल, वाकड, कस्पटेवस्ती परिसरात डासांचा प्रादुर्भाव आहे. नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास व दुगंधीर्चा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी ठेकेदारामार्फत नदीपात्रातील जलपर्णी काढली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविली. तसेच सात दिवसात जलपर्णी काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.  मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची १९ लाखांची निविदा आहे. जुनपर्यंत त्याची मुदत आहे. ठेकेदार पाऊस पडण्याची वाट बघतात. पाऊस पडल्यावर जलपर्णी वाहून जाते. जलपर्णी न काढता फुकटचे पैसे घेतात. त्यामुळे पावसाळ्या अगोदर संपूर्ण जलपर्णी काढण्यात येणार आहे''- डॉ. अनिल रॉय (आरोग्य वैद्यकीय अधिकारी )

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी