शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एकही निवाराशेड नाही धड

By admin | Updated: December 11, 2015 00:43 IST

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या

रहाटणी : रहाटणी, पिंपळे सौदागर परिसराचा विकास झपाट्याने झाला असे सांगितले जाते. भागाच्या काही प्रमाणात अधिक नागरी सुविधा या परिसरात पालिका प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या. मात्र शहरातील इतर भागापेक्षा रहाटणी हा भाग म्हणावा तसा विकसित झालाच नाही. मागील काही वर्षांपासून रहाटणी चौकातील साधा बसथांबा दुरुस्त करण्यात आला नाही. या ठिकाणी तीन बसथांबा प्रवासी निवारा शेड आहेत. मात्र एकही निवारा शेड चांगली नसल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंत प्रवाशांना उघड्यावरच थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील प्रवासी व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.रहाटणी चौकात मुख्य बसथांबा आहे. शहरातील सर्वच भागांत जाण्यासाठी येथून पीएमपी बस सुटतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे थांबलेले असतात. मागील अनेक वर्षांपूर्वी येथे निवारा शेड उभारण्यात आले. त्यानंतर देखभालीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. या तीनही शेड पूर्णत: मोडकळीस आल्या आहेत. वादळी वाऱ्यात शेड पडून अपघात होऊ शकतो. तसेच या शेडमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसची प्रतीक्षा रस्त्यावर ताटकळत उभे राहूनच करावी लागत आहे. हा मुख्य रस्ता व चौक असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे . तसेच या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . तरी महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. शहरासह आजूबाजूच्या परिसरात नको त्या ठिकाणी सुद्धा नवीन आधुनिक पद्धतीचे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आले आहे. पण, या ठिकाणचे शेड तुटलेल्या अवस्थेत मागील काही वर्षांपासून आहेत. याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष जात नाही की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)> 1शहरातील काही ठिकाणच्या बीआरटी मार्गावरील बस सुरू झाल्या. या मार्गावर एकाच ठिकाणी दोन सुसज्ज बसथांबा प्रवासी निवारा शेड उभारण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर बसथांबा शेड उभारण्यात आल्या आहेत. अशा काही बसथांब्यांवर प्रवासी शोधूनही दिसत नाहीत. मात्र, रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या येथील निवारा शेडची एवढी दयनीय अवस्था व्हावी ही स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत.2पिंपरी-चिंचवड शहराचा व उपनगरांचा काही वर्षांत झपाट्याने विकास झाला. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या नागरी सुविधा मिळाल्या. मात्र रहाटणी भाग तसा मागासलेलाच राहिला. रस्ते विकसित नाहीत , फुटपाथ नाहीत. नियोजित डीपी रस्ते अद्यापही विकसित नाहीत. भाजी मंडई नाही. खेळाचे मैदान नाही. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण नाही. कायम पाण्याचा प्रश्न सतावतो. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग असतात. त्यामुळे रहाटणीगाव व परिसर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडतो. एखाद्या खेडेगावची परिस्थिती बरी म्हणण्याची वेळ सध्या रहाटणीकरांवर आली आहे.