शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी येथील वायसीएमच्या आयसीयू विभागात रूग्णांना नाही जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:05 IST

महापालिकेच्या यंशवतराव चव्हाण रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयूमध्ये कधीही रूग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते.

ठळक मुद्देखासगी रूग्णालयात जाण्याचा डॉक्टर देतात सल्ला आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, गरजू रूग्णांना या परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागते

पिंपरी : महापालिकेच्या  यशवंतराव चव्हाण रूग्णालया वायसीएम रूग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये रूग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. कधीतरी अपवादात्मक परिस्थितीत नव्हे तर हे विदारक वास्तव नित्याचेच झाले आहे. आयसीयूसाठी रूग्णाच्या खाटेचे बुकींग करून वायसीएममध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत खासगी रूग्णालयातील आयसीयूमध्ये रूग्णांना दाखल करण्याची वेळ रूग्णांवर येत आहे. खासगी रूग्णालयाचा खर्च पेलविण्याची आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, गरजू रूग्णांना या परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागते आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयूमध्ये कधीही रूग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते. खासगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करा, आपल्याकडे जागा उपलब्ध होताच, रूग्णा आणता येईल, असे वायसीएमचे डॉक्टर सांगतात. मंगळवारी दुपारी एकास हदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. या रूग्णास वायसीएममध्ये नेले असता, आयसीयूमध्ये जागा नाही, असे सांगण्यात आले. रूग्णाची प्रकृती बिकट असतानाही त्याच्यावर सर्वसाधारण वॉर्डातच उपचार करण्यात आले. रात्री त्यास ऑक्सिजनची गरज भासली, त्यावेळी थोडावेळ त्यास अतिदक्षता विभागात नेऊन पुन्हा सर्वसाधारण वॉर्डात आणून ठेवले आहे. अद्याप त्याच्या कोणत्याही महत्वाच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या नाहीत, अहवाल प्राप्त झालेले नाहीत. वायसीएममध्ये एका आयसीयूमध्ये १५ तर दुसऱ्या ठिकाणी १८ खाटा आहेत. नव्याने २५ खाटांच्या आयसीयूचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र ते पूर्ण झालेले नाही. आयसीयू उपलब्ध नाही म्हणुन रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ येऊ नये, याची महापालिका वैद्यकीय विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. गरीब, गरजुंसाठीचे हे रूग्णालय त्यांच्यासाठी अत्यंत तातडीच्यावेळी उपयोगात आले नाही तर रूग्णालयाचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल