शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : भाजपा-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमत; ५०० कोटींच्या उपसूचनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 07:04 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी त्यामध्ये काँग्रेस आणि राष्टÑवादीतील सदस्यांची संख्या अधिक आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया भाजपानेही विरोधकांशी सलगी करण्यास सुरुवात केली आहे. उपसूचनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत खटके उडत असताना गेल्या सभेत जादू झाली आहे. सूचनांचा पाऊस पडला आहे. सुमारे ५०० कोटींच्या उपसूचना मंजूर केल्या आहेत.महापालिकेत भाजपाची सत्ता आली असली, तरी कारभारी जुनेच आहेत. पहिल्यांदाच सत्ता आल्याने सुरुवातीला सभागृह चालविण्यात धांदल उडाली होती. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. गेल्या महासभेत उपसूचनांना राष्टÑवादीच्या विरोधकांनी फारसा ठोस असा विरोध केला नाही.राष्ट्रवादीच्या कार्यकाळात एखादा प्रकल्प सुरू केल्यानंतर त्या कामाचा खर्च काही कारणास्तव वाढला, असे सांगून वाढीव खर्चाचे प्रस्ताव मंजूर केले जात असत, मूळ कामाच्या प्रस्तावात अतिरिक्त कामाचे प्रस्ताव जोडले जात आणि त्यासाठी पुन्हा निधीची तरतूद केली जात. हीच परंपरा भाजपाने कायम ठेवली आहे. महापालिका सभेत वाढीव - सुधारित खर्चाच्या सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांच्या उपसूचना मंजूर केल्या आहेत. त्यात भाजपा पदाधिकारी आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांच्या प्रभागातील विकासकामांचा समावेश आहे. महापालिकेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा मूळ ३०४८ कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ४८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसंमतआहे. सार्वत्रिक निवडणुकीमुळेयंदा अर्थसंकल्पाला विलंब झाला. त्यातच सत्तांतर झाल्याने भाजपाने उपसूचनांचा पाऊस पाडत अर्थसंकल्पीय तरतुदींमध्येफेरफार केले.पिंपळे गुरव येथे रस्ता विकसित करणे, पुतळा उभारणे, प्रभागांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करणे, शाहू उद्यान - बर्ड व्हॅली उद्यान आणि शिव - शाहू - शंभो उद्यानाचे नूतनीकरण, पिंपळे सौदागरमध्ये रस्त्याचा विकास करणे,नाल्याला भिंत बांधणे, ग प्रभागात रस्त्याचे चर बुजविणे, ड प्रभागातील रस्त्यांचे चर बुजविणे, पिंपळे निलखमध्ये रस्ता, प्रभागात नाल्यांची कामे, बीआरटी रस्त्यामधील नाला बंदिस्त करणे, काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती दरम्यान ग्रेड सेपरेटर बांधणे अशा १२७ कोटी ५० लाखांच्या नवीन कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे. तर, कृष्णानगरातील स्पाईन रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याऐवजी पादचारी भुयारी मार्ग उभारणे अशा सुधारणा कामासही उपसूचनेद्वारे मान्यता दिली आहे. या कामासाठी पूर्वी ४५ लाखांचीतरतूद आता चार कोटी ४५ लाख रुपये केली आहे. कृष्णानगरातील जागांचे सपाटीकरण, सीमाभिंतीसाठी सहा कोटी रुपयांची सुधारित तरतूद केली आहे.