शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गुणवत्तावाढीवर भर देणार : नितीन काळजे

By admin | Updated: May 30, 2017 02:41 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.महापालिका भवनात महापौरांनी शिक्षण मंडळाची आढावा बैठक घेतली. महापौर दालनात झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शिक्षणाधिकारी बी. एस. आवारी, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते. याविषयी माहिती देताना महापौर म्हणाले, ‘‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य, गणवेश देण्यात यावे. ज्या शाळेत शिक्षक कमी आहेत. तिथे तासिकेवर शिक्षक घेण्यात यावेत. खरोखरच पासची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मोफत पास देण्यात यावेत. शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्यात यावे. ई-लर्निंग उपक्रम सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमिक शाळा खासगी संस्थाना चालविण्यासाठी देण्याचा विचार सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे वेळीच नियोजन करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम त्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडेल.’’पुरस्कार योग्य व्यक्तींनाच मिळावामहापौर म्हणाले, ‘‘चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत. पुरस्कारासाठी पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारसी योग्य नसतील तर त्या स्वीकारू नयेत. आदर्श शिक्षक पुरस्कार निवडण्यासाठी एक समिती नेमावी. त्या समितीने त्यांच्या कार्याची माहिती घ्यावी आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा.’’