शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतर्फे नवे क्रीडा धोरण, खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:48 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा विभागातील प्रश्नांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक झाली. त्यात लवकरच क्रीडा धोरण तयार केले जाणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर खेळाडूंची मदत घेऊन क्रीडा क्षेत्रात महापालिकेचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा विभागातील प्रश्नांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक झाली. त्यात लवकरच क्रीडा धोरण तयार केले जाणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर खेळाडूंची मदत घेऊन क्रीडा क्षेत्रात महापालिकेचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव धोरणात केला जाणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कला आणि क्रीडा विभाग निर्माण केला आहे. या विभागावर मोठ्याप्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र, निधीच्या तुलनेत राष्टÑीय किंवा आंतरराष्टÑीय पातळीवर खेळाडू चमकलेले नाहीत. त्यामुळे क्रीडा विभाग आणि धोरणात बदल करण्याचे नियोजन भाजपाने सुरू केले आहे.आयुक्तांच्या दालनात अधिकारी आणि क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत क्रीडा विभागाच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आला. क्रीडा विभागाचे उपक्रम, त्याची फलनिष्पत्ती यावर चर्चा झाली. तसेच तरण तलाव आणि खेळाची मैदाने, व्यायामशाळा यांची सद्य:स्थिती यावरही चर्चा झाली. त्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यावरही सविस्तर चर्चा झाली. त्या वेळी क्रीडा धोरणात बदल करण्याचे निश्चित करण्यात आले.>तरण तलावावरसाडेचार कोटी खर्चसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहरातील विविध भागांत महापालिकेचे १२ तरण तलाव असून त्यावर वर्षाला साडेचार कोटी रुपये खर्च होत आहे. मोठ्याप्रमाणावर तरण तलाव असतानाही अमोल आढाव सारखे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्विमर तयार झालेले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. या साठी क्रीडा धोरणात काही बदल करणे अपेक्षित आहे. चांगल्या संस्था आणि खेळाडूंना एकत्र करण्याची गरज आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’>धोरणात होणारमान्यवरांचा समावेशहॉकी, टेनिस, लॉन टेनिस, जलतरण पटू, कुस्ती, नेमबाजी, अ‍ॅथलेटीक्स, बॅडमिंटन आदी विविध खेळांचे मान्यवर खेळाडू या शहरात आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यात येणार आहे. नामवंत खेळाडूंच्या सूचनांचा अंतर्भाव नवीन धोरणात करण्यात येणार आहे.