शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अक्षतांमधून धान्य नासाडी, तांदूळ व ज्वारीऐवजी फुलांचा वापर होण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 03:47 IST

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही.

रहाटणी -  लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही. आज वाढती महागाई व जाणवत असलेली अन्नाची टंचाई यामुळे सर्वसामान्यांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. यामुळे येणा-या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे.या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकते, हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. लग्नात वरवधूच्या मस्तकावर अक्षता टाकण्याची पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. यामागचे नेमके कारण कुणालाही माहीत नाही. पूर्वांपार चालत आलेली ही परंपरा आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते, हे सर्वांना कळते. मात्र वळत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सध्याच्या धावपळीच्या व महागाईच्या जमान्यात अनेक कुटुंब असे आहेत की आहे त्या अन्नाचे काय करायचे तर काही कुटुंब असे आहेत की एका वेळच्या जेवणाच्या अन्नासाठी काय करायचे अशी परिस्थिती आहे़ मात्र आपल्याकडे रूढी परंपरेच्या नावाखाली शेकडो किलो अन्न वाया जात आहे. हेच अन्न एखाद्या गरजवंताच्या मुखात गेले तर तो त्या नवदांपत्यास आशीर्वादच देतील. जर आपल्या देशाचा विचार केला तर लग्नातील अक्षदांच्या नावाखाली वर्षाला हजारो किलो अन्न वाया जाते यात शंका नाही. खरे तर समाजातील विचारवंतांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ वाया जाण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेले तर तो संतुष्ट तर होईल.धान्याची नासाडी थांबविण्याची अपेक्षादेशात अनेक कुटुंबाना एक वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावेलागत आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार लग्न समारंभात ज्वारी किंवातांदूळ अक्षता म्हणून वापरले जाते़ मात्र हे सर्व धान्य वायाच जाते. याचा फायदा कोणालाही होत नाही. त्यामुळे धान्य वाया घालण्या पेक्षा लग्न समारंभात फुलांचा वापर केल्यास देशातील बºयाच धान्याची नासाडी होणार नाही़ व ते पुढे उपयोगी येईल, अशी अपेक्षा काही सामाजिक संघटना व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र