शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिवाढीस अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची गरज - भालचंद्र मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:23 IST

देशाच्या विकासदरात सातत्याने घट होत असूनही राज्यकर्ते ती मान्य करत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. आर्थिक महासत्तेचा डांगोरा पिटणे बंद केले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सरकारने रोजगारविषयक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, असंघटित बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण करून द्याव्यात़

तळेगाव दाभाडे : देशाच्या विकासदरात सातत्याने घट होत असूनही राज्यकर्ते ती मान्य करत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. आर्थिक महासत्तेचा डांगोरा पिटणे बंद केले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तर सरकारने रोजगारविषयक धोरणावर लक्ष केंद्रित करावे, असंघटित बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण करून द्याव्यात़ राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असून उद्ध्वस्त होत असलेल्या कृषिवाढीसाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूदीची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारताचे सध्याचे आर्थिक धोरण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, गोरक्षनाथ काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.डॉ. मुणगेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांना ‘कृष्णराव भेगडे साहित्यभूषण पुरस्कार’ प्रदान केला. दरम्यान, ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राष्ट्रीय महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार असल्याचे मुणगेकर यांनी नमूद केले. प्रास्ताविक रामदास काकडे यांनी केले. प्राचार्य दत्तात्रेय बाळसराफ यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. तर आभार शैलेश शाह यांनी मानले.दोन कोटी रोजगार देण्याच्या वल्गना झाल्या़ मात्र प्रत्यक्षात केवळ ७ ते ८ लाख लोकांनाच रोजगार मिळाला. सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळाले नाही तर विघातक वृत्ती जोपासल्या जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षण व आरोग्यासारख्या जीवनावश्यक व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा सपाटा केंद्र व राज्य सरकारने लावला असल्याचा थेट आरोप करताना त्यांनी शाळाबंदी आणि रुग्णालयांचे खासगीकरण यावर सडकून टीका केली. - डॉ. भालचंद्र मुणगेकर

टॅग्स :Bhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड